महत्वाच्या बातम्या

 पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात गडचिरोली पोलीसांना मिळाले यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात गडचिरोली पोलीसांना मिळाले यश मिळाले आहे. 

०३ नोव्हेंबर २०२२ रोजी पोस्टे एटापल्ली येथील पोस्को ॲक्ट गुन्ह्यातील फरार आरोपी नामे सुंदरसाई घिस्सो मडावी (२५) रा. करपनफुंडी ता. एटापल्ली हा ०२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गेल्या ०३ महिन्यांपासून फरार झाला होता. सदर फरार आरोपी हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असलेल्या येलचिल बुर्गी, ताडगाव अशा वेगवेगळ्या जंगल परिसरामध्ये लपुन बसला असल्यामुळे व हा परिसर नक्षलदृष्ट्या अतिप्रभावीत असल्यामुळे त्याचा शोध घेण्यास पोलीसांना खुप अडचणींचा सामना करावा लागला होता.

०३ नोव्हेंबर २०२२ रोजी पोलीसांनी गोपनिय यंत्रणा सक्रीय करून व गुप्त माहितीच्या आधारे अभियान राबवून आरोपी सुंदरसाई मडावी यास मौजा करपनकुंडी गावात पकडून अटक करून जिल्हा सत्र व विशेष न्यायालय, गडचिरोली येथे पोलीस कस्टडी रिमांड घेण्याकरिता हजर करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी बापुराव दडस यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि श्रीकृष्ण शिंदे पोलीस मदत केंद्र बुर्गी, पोउपनि संदिप व्हसकोटी व पोमके बुर्गी येथील पोलीस अंमलदार यांच्या टिमने केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos