महत्वाच्या बातम्या

 कुचना येथे जुगार अड्ड्यावर माजरी पोलिसांची धाड : ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कुचना परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर माजरी पोलिसांनी धाड टाकून चार जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते आणि तीन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना २८ ऑगस्ट रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास मौजा कुचना, समृद्धी वसाहत परिसरात छापा टाकला. यावेळी चार इसम गोलाकार बसून ३२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावत जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी जुगाराच्या डावावरील २ हजार ८०० रुपये रोख, पत्ते, आरोपींच्या अंगझडतीत मिळालेले ६ हजार ५०० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले तीन अँड्रॉइड मोबाईल, किंमत ८० हजार रुपये, असा एकूण ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला. या प्रकरणी अमित मानिकराव परचाके (३४), स्वप्निल सुभाष पिदुरकर (३०), अंकुश उर्फ शंकर हरिचंद्र महातके (३८) आणि माष्कर महादेव चोपणे (४९), सर्व रा. कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर, यांच्याविरुद्ध माजरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १४८/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुबोध वंजारी यांचा नेतृत्वात पोहवा हरिचंद्र देऊळकर, पोअं. प्रमोद मिलमिले ,अशोक नायर, सोहन गुरणुरे, सुरज वासेकर, हेमंत बोरकर यांनी केले.





  Print






Related Photos