ब्रम्हपुरी येथील वखार महामंडळाचा कनिष्ठ साठा अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात


- पाच हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / ब्रम्हपुरी : कामावरून काढून टाकण्याची धमकी देत १०  हजारांची लाच मागणारा ब्रम्हपुरी येथील महाराष्ट्र  राज्य वखार महामंडळाचा कनिष्ठ साठा अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.  सुर्यकांत कृष्णराव एडलकर (५०)  असे लाचखोर कनिष्ठ साठा  अधिक्षकाचे नाव आहे. 

तक्रारदार  ब्रिक्स इंडिया लिमीटेड कंपनीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,  ब्रम्हपूरी येथे   २०१४  पासून अॅटैडन्ट कम आॅपरेटर म्हणून काम करीत असुन काही  दिवसापुर्वी तक्रारदार व त्यांचा सहकारी पवन गुलाबराव धनविजय यांनी मिळून काही लोखंडी साहीत्य परस्पर विकल्याने कनिष्ठ साठा अधिक्षक  सुर्यकांत कृष्णराव एडलकर याने कंपनीस कळवून कामावरुन काढून  टाकण्याची धमकी दिली. तसेच  कामावरून काढुन न टाकण्यासाठी तक्रारदारास  १०  हजारांची मागणी केली. तक्रारदारास सुर्यकांत  एडलवार याने मागणी  केलेली लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर  येथे तक्रार नोंदविली.  लाचलुचपत  प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर तर्फे सापळा कार्यवाही आयोजीत केली असता  सापळा कार्यवाही दरम्यान कनिष्ठ साठा अधिक्षक  सुर्यकांत एडलवार यांनी  तक्रारदारास  १०  हजार रूपये लाचेची मागणी करून पहिला  हफ्ता म्हणुन  ५ हजार रू लाचरक्कम स्विकारली. यावरून आरोपी विरूध्द पोलिस ठाणे ब्रम्हपुरी  येथे कलम ७ (अ) लाचलुचपत प्रतिबंध कायदा (सुधारीत) अधिनियम  २०१८  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला  आहे. सदर  कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक  विभाग, नागपूर चे  पोलीस अधिक्षक  पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक  डि.एम. घुगे, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, नापोकाॅ. महेश मांढरे, संतोष येलपूलवार, अजय बागेसर, पोलिस शिपाई रवीकुमार ढेंगळे व चालक पोलिस शिपाई राहूल ठाकरे  यांनी केली आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-09-06


Related Photos