उद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक : आ.डाॅ. देवराव होळी


- मेक इन गडचिरोली अंतर्गत प्रथमच १०० उद्योजकांची कार्यशाळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टीकोणातून नवउद्योजकांना चालना देण्यासाठी मेक इन गडचिरोली हा अभिनव उपक्रम राबवित आहोत. मात्र नवउद्योजकांनी केवळ उद्योग उभारून चालणार नाही तर उद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आ.डाॅ. देवराव होळी यांनी केले.
आज २८ आॅगस्ट रोजी स्थानिक प्रेस क्लब भवनातील सभागृहात आयोजित १०० उद्योजकांच्या पहिल्या कार्यशाळेत आ.डाॅ. देवराव होळी बोलत होते. कार्यशाळेला जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक भोसले, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी बढे, पतंजली योग समितीच्या सुधा सेता, मेक इन गडचिरोलीचे प्रकल्प समन्वयक श्रीनिवास दोंतुलवार, अनोक गनपल्लीवार, रमेश अधिकारी उपस्थित होते. 
कार्यशाळेत दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, जिनींग प्रेसींग, बांबू फर्निचर, राईस मिल, गारमेंट, दुग्ध प्रक्रिया , मिनरल वाॅटर, फेन्सिंग उद्योग, हाॅट मिक्स, बॅच मिक्स, शेळी पालन, ग्राॅफिक्स, प्रिंटींग व इतर ५० लाख ते २  कोटी रूपयांपर्यंत गुंतवणूक असलेल्या उद्योगांबाबत मार्गछर्शन करण्यात आले. 
पुढे बोलताना आ.डाॅ. होळी म्हणाले, मेक इन गडचिरोली च्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे अनेक उद्योजक समोर आले. मात्र स्वतःचा उद्योग स्वतः उभारणे हा मुख्य उद्देश आहे. यासाठी लागणारी उपयुक्त माहिती, केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान याबाबतची माहिती पुरविण्याचे काम मेक इन गडचिरोली करणार आहे. तुमच्या इच्छाशक्तीशिवाय आम्ही काहीच करू शकणार नाही. यामुळे इच्छाशक्तीच्या बळावर उद्योग निर्माण करा आणि सुरळीत सुरू ठेवा. यासाठी नियमित कार्यशाळा आयोजित केल्या जातील. जिल्ह्यात आतापर्यंत १७२ प्रकल्प मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत. आतापर्यंत कधीही असे झाले नाही. जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये अनेक उद्योजकांनी उद्योग उभारणीच्या नावे भूखंड खरेदी केले मात्र उद्योग उभारले नाहीत. यामुळे असे भूखंड परत घेवून नवउद्योजकांना देण्यात यावे, याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. भविष्यात शेती हा व्यवसाय न ठेवता शेती पुरक उद्योग निर्माण होणार आहेत, असेही आ.डाॅ. होळी म्हणाले. यावेळी सुधा सेता यांनी व्यक्तीमत्व विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाभरातील १०० उद्योजक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अभियंता राजु दासरवार, जीवनकुमार चक्का, श्रावण मक्केना, आशिष गोरडवार, मिथून गेडाम, प्रफुल निकासे  यांनी सहकार्य केले.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-28


Related Photos