महत्वाच्या बातम्या

 विभागस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे सुयश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /  गडचिरोली :- संत उर्सुला गर्ल्स हायस्कूल नागपुर येथे नुकत्याच झालेल्या विभागास्तारिय विज्ञान नाट्य स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालायाने उत्तम नाट्य सादर करीत स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे .

महाराष्ट्र राज्य शासन तर्फे प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रवीनगर नागपूर यांच्या वतीने सत्र २०२२-२३ करिता राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा अंतर्गत विभागास्तारिय विज्ञान नाट्य स्पर्धेचे आयोजन नागपुर येथील संत उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे करण्यात आले होते, यामध्ये संपूर्ण   नागपुर विभागातुन एकून १२ नाट्य संघाने सहभाग नोंदविला होता यामध्ये, गोंडवाना सैनिकी विद्यालायाने आपल्या कलेची चुनुक दाखवित नाट्यामधून समाजासाठी विज्ञान कसा उपयुक्त आहे, हे विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषय व लासिची कथा या उपविषया अंतर्गत विज्ञान नाटकाचे उत्तम सादारिकरण केले व उपस्थित रसिक प्रेक्षकांचे मने जिंकित स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. विद्यालयातील कॅडेट मास्टर ऐश्वर्य कचलामी, अनुज गजभिये, अंशुमन आक्केवार, शुभम कोकणे, श्रीहर्ष बुधबावरे, चेतन आत्राम व अनुराग लेकामी, यांनी प्रमुख कलाकारांची भूमिका बजावली या सर्व कलाकारांचे मान्यवर तथा परिक्षकांच्या हस्ते पुष्प, रोख रक्कम १००१ रुपये व प्रशस्तिपत्र देवून त्यांच्या गौरव करण्यात आला. या संपूर्ण नाटकाचे लेखन व दिग्दर्शन नरेन्द्र उन्दिरवाडे यांनी केले तर निर्मिती देवेन्द्र म्हशाखेत्री यांनी केले व नाटकाला संगीत सुनील लोखंडे यांनी दिले. विशेष सहकार्य प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे तथा पर्यवेक्षक अजय वानखेड़े यांचे लाभले.भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी चे अध्यक्षा भाग्याश्रीताई हलगेकर( आत्राम), सचिव धर्मरावबाबा आत्राम व मार्गदर्शक रुतुराज हलगेकर यांनी संपूर्ण विजेत्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छाही दिल्या. 

--------------------------------------------------







  Print






News - Gadchiroli




Related Photos