महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

पोषण माह अभियान समारोपातून महिला सुरक्षा : बालसंरक्षण व पोषणाबाबत जनजागृती बातम्या - Chandrapur

पोषण माह अभियान समारोपातून महिला सुरक्षा : बालसंरक्षण व पोषणाबाबत जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस   प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड येथील माळी समाज भवनात ९ ऑक्टोबर रोजी पोषण माह अभियान समारोप व सेवा संकल्प अभियानानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिलांचे आरोग्य, बालकांचे संरक्षण, महिला सुरक्षा आणि पोषणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाला चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्विनी गिऱ्हे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदक्कर, अंगणवाडी पर्यवेक्षिका साधना मेश्राम, सखी वन स्टॉप सेंटरच्या कल्याणी रायपुरे यांच्यासह नागरी प्रभागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.कार्यक्रमानिमित्त पाककला स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपस्थित महिलांना संतुलित आहाराचे महत्त्व, वै...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बातम्या - Chandrapur


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी, जिवती व बल्लारपूर या तीन तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के क्षेत्रावर सर्वेक्षण (ग्राऊंड ट्रुथिंग) करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. यासाठी संबंधित तहसीलदारांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची संयुक्त पथके गठित करून सर्वेक्षणाची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहे.राज्यात अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक २९ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार राज्यातील ट्रिगर-१ लागू असलेल्या २६५ तालुक्यांमध्ये १०० टक्के पीकपाहणी करून भौतिक व...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सिंदेवाहीत रेती वाहतूक करणारा ट्रक पलटी : चालकाविरुद्ध गुन्हा दाखल बातम्या - Chandrapur

सिंदेवाहीत रेती वाहतूक करणारा ट्रक पलटी : चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस   प्रतिनिधी / चंद्रपूर : नवरगाव-सिंदेवाही मार्गावरील एमआयडीसी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकचा मागील डाला पलटी झाल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी ट्रकचालक अब्दुल आतीफ शेख रफीक  ४८ वर्ष, रा. जुने शहर, अकोला याच्याविरुद्ध सिंदेवाही पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिंदेवाही पोलीस ठाण्याचे पथक नवरगाव-सिंदेवाही मार्गावर गस्तीवर होते. दरम्यान, एमआयडीसी परिसरात सिंदेवाहीकडून नवरगावच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम ९५९९ भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन त्याचा मागील डाला पलटी झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ट्रकच्या पलटी झालेल्या डल्यामध्ये र...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विसापूर येथे अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत ८ हजार उमेदवारांचा सहभाग बातम्या - Chandrapur

विसापूर येथे अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत ८ हजार उमेदवारांचा सहभाग


- १७ ऑक्टोबरपर्यंत चालणार भरती प्रक्रिया- जिल्हा प्रशासनाकडून निवास, भोजन, आरोग्य व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्थाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय सैन्य दलातील अग्निवीर पदांच्या भरतीसाठी विसापूर (ता. बल्लारपूर) येथील क्रीडा संकुलात २ ऑक्टोबरपासून सैन्य भरती प्रक्रिया उत्साहात सुरू आहे. ही भरती प्रक्रिया १७ ऑक्टोबर  पर्यंत चालणार असून, यामध्ये विदर्भासह महाराष्ट्रातील इतर जिल्हे व गुजरात राज्यातील एकूण ८०१७ उमेदवार सहभागी होत आहेत.जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने भरतीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, भारतीय सैन्याच्या निर्धारित नियम व निकषांनुसार भरती प्रक्रिया शिस्तबद्ध, पारदर्शक व सुरळीतपणे राबविण्यात येत आहे.लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची शारीरिक व वैद्यकीय चाचणी : भारतीय सैन्याच्या आर्मी रिक्रूटिंग ऑफि...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
अग्निवीर भरतीसाठी बेरोजगार युवकांची विसापूरकडे धाव बातम्या - Chandrapur

अग्निवीर भरतीसाठी बेरोजगार युवकांची विसापूरकडे धाव


- देशसेवेचे स्वप्न उराशी; ८,०१७ पदांसाठी शारीरिक चाचणी सुरूविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवकांची पावले सध्या विसापूरकडे वळली आहेत. बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे ३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान अग्निवीर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागपूर आर्मी रिक्रूटिंग ऑफिस (एआरओ) यांच्या माध्यमातून एकूण ८ हजार १७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून, लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सध्या शारीरिक चाचणी घेतली जात आहे. सैन्यात दाखल होऊन देशाचे रक्षण करण्याची जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर यश मिळविण्याची उमेद युवकांमध्ये दिसून येत आहे.देशभरात भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी अनेक युवक तयारी करीत असतात. शारीरिक तंदुरुस्ती, नियमित सराव आणि देशसेवेची प्रेरणा घेऊन हे युवक भरती प्रक्रियेत सहभागी होत आह...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
३५ हजार केशर आंब्यांच्या कलमांनी बहरणार जिल्हा : भेंडवी येथे लागवड मोहिमेला सुरुवात बातम्या - Chandrapur

३५ हजार केशर आंब्यांच्या कलमांनी बहरणार जिल्हा : भेंडवी येथे लागवड मोहिमेला सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच हरित आच्छादन वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. विकसीत भारत ग्रामीण रोजगार व आजिविका हमी योजना (व्हीबीजी-राम-जी) आणि जिल्हा खनीकर्म प्रतिष्ठान निधीच्या अभिसरणातून जिल्ह्यातील तब्बल ५० ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी  केशर आंब्याची लागवड करण्यात आली. राजुरा तालुक्यातील भेंडवी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केशर आंब्याचे कलम लावून जिल्हास्तरीय शुभारंभ केला.जिल्हाधिकारी वसुमना पंत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्व विभागप्रमुखांनी  प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावून केशर आंब्याची लागवड केली.कोकण कृषी विद्याप...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपुरात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान भव्य कमल दांडिया महोत्सव : २ लाख ६१ हजार रुपयांची बक्षिसे बातम्या - Chandrapur

बल्लारपुरात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान भव्य कमल दांडिया महोत्सव : २ लाख ६१ हजार रुपयांची बक्षिसे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, बल्लारपूरच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त १६, १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य कमल दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शगुन लॉनसमोरील मैदानावर हा महोत्सव रंगणार असून, स्पर्धकांसाठी एकूण २ लाख ६१ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सोलो ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला अभियानांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी बातम्या - Chandrapur

तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला अभियानांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी


- मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगाचे लवकर निदान करण्यावर विशेष भरविदर्भ न्यूज एक्सप्रेस   प्रतिनिधी / चंद्रपूर : असंसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यात ३० वर्षांवरील सर्व नागरिकांची  घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला या १०० दिवसांच्या विशेष अभियानांतर्गत आतापर्यंत उच्च रक्तदाबासाठी २ लाख ११ हजार ९१५ तर मधुमेहासाठी १ लाख ५० हजार ४१० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.हे अभियान १  सप्टेंबर ते १०  डिसेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. ३० वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून मधुमेह, उच्च रक्तदाब आणि विविध प्रकारच्या कर्करोगांचे वेळेत निदान करणे, संशयित रुग्णांना पुढील तपासणीसाठी संदर्भित करणे तसेच आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे यावर व...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण व जिवती येथे ३४८ विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी बातम्या - Chandrapur

सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण व जिवती येथे ३४८ विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी


- दंत किड, फ्लोरोसिससह तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मौखिक आरोग्य कक्ष, दंत विभाग, कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील दंतशास्त्र विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  ९ऑक्टोबर रोजी पाटण येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा आणि जिवती येथील शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे दंत व मुख आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा दंत शल्यचिकित्सक डॉ. संदीप पिपरे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले.यावेळी डॉ. पिपरे यांनी विद्यार्थ्यांना सेवा संकल्प अभियानाची माहिती देत मौखिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. दुर्गम व आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
अवैध रेती वाहतुकीवर एलसीबीची धडक कारवाई : ४० लाखांचा ट्रक जप्त बातम्या - Chandrapur

अवैध रेती वाहतुकीवर एलसीबीची धडक कारवाई : ४० लाखांचा ट्रक जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या महेंद्र कंपनीच्या १६ चाकी पल्ला ट्रकवर कारवाई करत पोलिसांनी १० ब्रास रेतीसह एकूण ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, वाहनमालकाचा शोध सुरू आहे.१० ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाला रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात नाकाबंदी करून कारवाई केली. यावेळी एमएच ४० सीव्ही ९३३३ क्रमांकाच्या १६ चाकी पल्ला ट्रकमधून रेतीची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.पोलिसांनी कारवाईदरम्यान ट्रक, त्यातील १० ब्रास रे...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →