गडचिरोलीत विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ, पोलिसांचा चोख बंदोबस्त


- ढोल ताशांचा गजर, दिड्यांची साथ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज २३ सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाची धूम असून गडचिरोली शहरातील अनेक मंडळांच्या तसेच खासगी गणेश मूर्तींच्या मिरवणुकांना प्रारंभ झाली आहे. मिरवणुकीदरम्यान तसेच तलाव आणि नदीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
न्यायालयाने डिजे वाजविण्यास बंदी घातली असल्याने अनेक मंडळांनी पारंपारिक वाद्ये, बॅन्ड, ढोल ताशा पथक आणि बॅन्जो ला पसंती दिली आहे. गडचिरोली पोलिसांनी तगडा बंदोेबस्त ठेवला आहे. डिजेचा आवाज क्षमतेपेक्षा अधिक आढळून येत असल्याने आतापर्यंत अनेक डिजे चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अनेकांनी धसका घेतला आहे. सध्यातरी उत्साहाच्या वातावरणात मिरवणुका निघालेल्या आहेत.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या गणेश मिरवणुकीत खासदार अशोक नेते, आमदार डाॅ. देवराव होळी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या मंडळाने भजनी दिंड्यांना प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-23


Related Photos