महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये ३५ हजार केशर आंबा लागवड बातम्या - Chandrapur

जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये ३५ हजार केशर आंबा लागवड


- भेंडवी (ता.राजुरा) येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आंब्याचे कलम लावून शुभारंभविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच हरित आच्छादन वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. विकसीत भारत ग्रामीण रोजगार व आजिविका हमी योजना (व्हीबीजी-राम-जी) आणि जिल्हा खनीकर्म प्रतिष्ठान निधीच्या अभिसरणातून जिल्ह्यातील तब्बल ५० ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी  केशर आंब्याची लागवड करण्यात आली. राजुरा तालुक्यातील भेंडवी येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केशर आंब्याचे कलम लावून जिल्हास्तरीय शुभारंभ केला.जिल्हाधिकारी वसुमना पंत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्व विभागप्रमुखांनी &n...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण व जिवती येथे ३४८ विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी बातम्या - Chandrapur

सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण व जिवती येथे ३४८ विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी


- दंत किड, फ्लोरोसिससह तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मौखिक आरोग्य कक्ष, दंत विभाग, कर्मवीर सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील दंतशास्त्र विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑक्टोबर रोजी पाटण येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा आणि जिवती येथील शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे दंत व मुख आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा दंत शल्यचिकित्सक डॉ. संदीप पिपरे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले.यावेळी डॉ. पिपरे यांनी विद्यार्थ्यांना सेवा संकल्प अभियानाची माहिती देत मौखिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. दुर्गम व आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या व...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
गोवरी-पोवनी कोळसा खाणीतून एक टन लोखंडी भंगार चोरीला बातम्या - Chandrapur

गोवरी-पोवनी कोळसा खाणीतून एक टन लोखंडी भंगार चोरीला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : वेकोलीच्या गोवरी-पोवनी कोळसा खाणीतील चेकपोस्ट परिसरात चार वर्षांपासून बंद असलेल्या वजनकाट्यावरील सुमारे एक हजार किलो लोखंडी भंगार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. वजनकाट्यावरील लोखंडी प्लेट्स, गर्डर आणि चॅनेल असा एकूण एक टन लोखंडी माल अज्ञात चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी वेकोलीच्या सुरक्षा विभागाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.गोवरी-पोवनी कोळसा खाणीतील चेकपोस्टवर कोळशाचे वजन करण्यासाठी वजनकाटा बसविण्यात आला होता. मात्र, वापरात नसल्याने हा वजनकाटा मागील चार वर्षांपासून बंद होता. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा प्रहरी तैनात करण्यात आले नव्हते. तसेच चेकपोस्टच्या आजूबाजूला झुडपी जंगल असल्याने परिसरात नियमित देखरेख होत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.८ ऑक्टोबर २०२६ रोजी वजनकाट्यावरील लोखंडी साहित्य चोरीला गेल्याची माहिती मिळा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कृत्रिम बुद्धिमत्ता जेवढी मानवी हिताची तेवढीच मानवी अस्तित्वासाठी धोकादायक! बातम्या - Chandrapur

कृत्रिम बुद्धिमत्ता जेवढी मानवी हिताची तेवढीच मानवी अस्तित्वासाठी धोकादायक!


- सुप्रसिद्ध लेखक मिलिंद कीर्ती यांचे प्रतिपादन; श्री ज्ञानेश महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : कृत्रिम बुद्धिमत्ता हे आधुनिक काळातील अत्यंत प्रभावी तंत्रज्ञान असून, वैद्यकीय क्षेत्रापासून शिक्षण, न्यायव्यवस्था, वाहननिर्मिती आणि सॉफ्टवेअर क्षेत्रापर्यंत त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक गतिमान आणि सुलभ होत असले, तरी दुसरीकडे अनेक क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी कमी होऊन मानवी अस्तित्वापुढे नवी आव्हाने निर्माण होत आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे केवळ प्रगतीचे साधन म्हणून न पाहता त्याचे फायदे आणि धोके समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत मिलिंद कीर्ती यांनी केले.सेवा संकल्प सप्ताह तथा अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताहाच्या निमित्ताने ९ ऑक्टोबर ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी महामंडळासाठी शासनाकडे मागणी बातम्या - Chandrapur

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी महामंडळासाठी शासनाकडे मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करून वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी अनमोल पाटील यांनी तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याकडे निवेदन सादर केले.वृत्तपत्र विक्रेते हे प्रसारमाध्यमांच्या वितरण व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. पहाटेपासून ऊन, पाऊस आणि थंडीची तमा न बाळगता ते नागरिकांच्या घरापर्यंत वृत्तपत्रे पोहोचवतात. मात्र, नियमितपणे आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या या विक्रेत्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या महामंडळाच्या अंमलबजावणीमुळे विक्रेत्यांच्या हितासाठी आवश्यक कल्याणकारी योजना राबविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपूरमध्ये बेटी बचाव-बेटी पढाव व पोषण आहार सप्ताहाची उत्साहात सांगता बातम्या - Chandrapur

बल्लारपूरमध्ये बेटी बचाव-बेटी पढाव व पोषण आहार सप्ताहाची उत्साहात सांगता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत बेटी बचाव, बेटी पढाव तसेच पोषण आहार सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर येथील साईबाबा सभागृहात करण्यात आले. नागरी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने तसेच जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, रेल्वे चाइल्ड लाईन आणि पंचायत समिती बल्लारपूरच्या संरक्षण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण, बालकांचे संरक्षण, मुलींचे शिक्षण, महिला व बालकांचे पोषण आणि विविध शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूरचे नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, नागरी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी दामोधर कुमरे, पंचायत समितीच्या संरक्षण अधिकारी परवीन शेख, ॲड. संदेश...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चिमूर येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा थाटात समारोप बातम्या - Chandrapur

चिमूर येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा थाटात समारोप


- अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा उत्स्फुर्त प्रतिसादविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) चिमूर अंतर्गत येत असलेल्या १६१ अंगणवाडी केंद्रातील सेविका आणि मदतनीसांच्या उपस्थितीत ९ व्या राष्ट्रीय पोषण माहचा समारोपीय कार्यक्रम स्थानिक शेतकरी भवनात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चिमुरचे गट विकास अधिकारी सुभाष बांदुरकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकाश भांदककर, मुख्यसेविका डॉ. अंजली ठेंगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यात प्रामुख्याने राष्ट्रीय पोषण माहचे उद्दिष्ट, बालकांचे आरोग्य, पौष्टिक आहाराचे महत्त्व, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व लेक लाडकी योजना या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, अंगणवाडी केंद्रासमोरील अडचणी आणि या कामात लोकसहभागाचे असणारे महत्त्व या विष...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
महसूल लोक अदालतीत १६ प्रकरणे निकाली बातम्या - Chandrapur

महसूल लोक अदालतीत १६ प्रकरणे निकाली


- अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयातील ५० प्रकरणांवर सुनावणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद, पारदर्शक व सामंजस्यपूर्ण पद्धतीने निपटारा करण्याच्या उद्देशाने नियोजन भवन येथे महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत घेण्यात आली. या लोक अदालतीत अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयातील एकूण ५० प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या उपस्थितीत ७ ऑक्टोबर रोजी ही महसूल लोक अदालत पार पडली. महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील पक्षकारांना परस्पर संवादातून तोडगा काढण्याची संधी उपलब्ध करून देणे, अनावश्यक विलंब टाळणे आणि नागरिकांना जलद न्याय मिळवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश हो...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प बातम्या - Chandrapur

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प


- जल सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती- शेतकरी व पाणी वापर संस्थांच्या सहभागातून प्रभावी जलव्यवस्थापनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने वापर करणे, पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, जलसंपत्तीचे संवर्धन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, यांच्या वतीने २ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत जल सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतकरी, पाणी वापर संस्था आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून जलव्यवस्थापन, पाणी बचत, सिंचन व्यवस्थेची देखभाल तसेच जलसंपत्तीच्या कार्यक्षम वापरासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील कमी पर्जन्यमान आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळणे, शेतकऱ्यांनी पिक...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
काम व रोजगाराच्या नाराजीतून कोळसा वाहतूक करणारा ट्रक पेटविला : एलसीबीकडून दोघांना अटक, चौघांची नावे निष्पन्न बातम्या - Chandrapur

काम व रोजगाराच्या नाराजीतून कोळसा वाहतूक करणारा ट्रक पेटविला : एलसीबीकडून दोघांना अटक, चौघांची नावे निष्पन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : काम व रोजगारासंबंधीच्या नाराजीतून कोळसा वाहतूक करणारा ट्रक पेटवून दिल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), चंद्रपूरच्या पथकाने उलगडा केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, तपासादरम्यान अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. २९ सप्टेंबर रोजी रात्री घुग्घुस ओपनकास्ट कोळसा खदानीजवळ ही घटना घडली होती.घुग्घुस ओपनकास्ट खदानीजवळ २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या दरम्यान कोळसा वाहतूक करणारा महिंद्रा ट्रक क्रमांक एमएच ३४ सीक्यू ३३८५ अज्ञात व्यक्तींनी अडवून पेटवून दिला. या घटनेत ट्रकचे नुकसान झाले. ट्रकचालक रमाकांत बाबूलाल सिंह ३५ वर्ष , रा. नकुनी, ता. बेहारी, जि. सहडोल, मध्य प्रदेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून घुग्घुस पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ (फ), १२६ (२) आणि ३ (५...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →