मार्डी येथे कु-हाडीने हल्ला करुन खुन केल्याप्रकरणी आरोपी प्रदीप भालशन्कर यास जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये द्रव्य दन्ड


- अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, पान्ढरकवडा न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटन्जी : मारेगाव पोलीस स्टेशन अन्तर्गत येत असलेल्या मार्डी येथे आरोपी प्रदीप उर्फ काल्या गोविंदराव भालशन्कर याने किरकोळ वादातुन कैलास बन्डू सलाम याच्या डोक्यावर, गळ्यावर, छातीवर व शरिराच्या इतर भागावर कु-हाडीने गम्भीर वार करुन खुन केल्या प्रकरणी, पान्ढरकवडा येथील न्यायाधिश - १, व तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश मनिष कोठारी यांनी जन्मठेपेची शीक्षा व १० हजार रुपये द्रव्य दन्ड ठोठावला. दन्ड न भरल्यास आणखी ६ महिन्याची शिक्षा आरोपीस भोगावी लागणार आहे. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. रमेश डी. मोरे यांनी मान्डली.
सदर प्रकरणात मारेगाव पोलीस ठाण्यात भान्दवि कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक (API) जनार्धन खन्डेराव यांनी करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाने एकूण ८ साक्षीदार तपासले. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मृतकाचा मित्र, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.
शासनाकडून सहाय्यक सरकारी वकील ऍड. रमेश डी. मोरे यांनी काम पाहीले. त्यान्ना पैरवी अधिकारी म्हणून महीला पोलीस शिपाई रोहीणी कुमरे यांनी सहकार्य केले.




Petrol Price




