महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज येथे संकल्प सेवा समितीतर्फे अधिकाऱ्यांचा सत्कार


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : प्रशासनातील विविध कार्यालयात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन संकल्प सेवा समितीच्या वतीने देसाईगंज येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात पोलीस विभागातील उपविभागीय अधिकारी साहिल झरकर, पोलीस निरीक्षक महेश मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, युनूस इनामदार, सुजाता भोपळे, सोनम नाईक यांच्या कार्याचा गुणगौरव करीत सन्मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी विश्व सिंधी सेवा संगमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा संकल्प सेवा समितीचे अध्यक्ष अनिल साधवानी, उपाध्यक्ष दिलीप कहुरके, प्रदेश सचिव मनोज ढोरे, आयटीआयचे शिल्प निदेशक लोही, अमित राऊत, राहुल सिडाम तसेच समिती सदस्य उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos