चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा घालणे, त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती करणे तसेच संकटाच्या काळात उपलब्ध असलेल्या शासकीय मदत व संरक्षण यंत्रणांची माहिती विद्यार्थिनींना व्हावी, या उद्देशाने एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई संचालित महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, बल्लारपूर येथे महिला व बाल संरक्षण तसेच सखी वन स्टॉप सेंटर या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. १५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमातून सशक्त महिला सुरक्षित समाज आणि सुरक्षित बालपण सशक्त भविष्य हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.चंद्रपूर जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या आदेशानुसार सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर राणी अरुणराव खडसे आणि महिला सक्षमीकरण केंद्र, चंद्रपूरच्या ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलिसांना गुंगारा देत तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली येथून ताब्यात घेतले. प्रशांत ऊर्फ पिंटू शशिकांत मिस्त्री ऊर्फ मंडल ३८ वर्षे रा. गडचिरोली असे या आरोपीचे नाव असून, दारूबंदीच्या काळात दाखल झालेल्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.सन २०१८ मध्ये नागभीड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अंतर्गत अप. क्र. ८०/२०१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात प्रशांत मिस्त्री याचा सहभाग असल्याच्या अनुषंगाने तो पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तब्बल आठ वर्षे तो फरार असल्याने त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.दरम्यान, चंद...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरालगतच्या जेना शेतवस्ती परिसरातून मोटारसायकल चोरीला गेल्याच्या प्रकरणात भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत आरोपी स्नेहल संतोष महाकुलकर (वय २५), रा. पानवडाळा, ता. भद्रावती याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान चोरीला गेलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.प्राप्त माहितीनुसार, अजय अनिल टोंगे (वय ३६), रा. गौतम नगर, भद्रावती, जि. चंद्रपूर यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक एमएच ३४ एएल ०६८६ चोरीला गेली होती. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.४५ वाजताच्या दरम्यान जेना शेतवस्ती परिसरातून ही मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती.या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. १००२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्ग...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी येथील रहिवासी हरिदास चंदनखेड़े यांच्यावर शेतातील काम आटोपून घरी परतताना काळाने घाला घातला. तळोधी-नागभीड मार्गावरील गोविंदपूर फाट्याजवळ भरधाव कारने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६२ वर्षीय हरिदास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शेतातील धानपिकाला पाणी देऊन सुखरूप घरी परतण्याची अपेक्षा असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तळोधी येथील रहिवासी हरिदास चंदनखेड़े हे १४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता धानपिकाला पाणी देण्यासाठी सायकलने शेताकडे गेले होते. शेतातील काम पूर्ण करून ते घरी परतत असताना तळोधीहून नागभीडच्या दिशेने जाणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारने (क्रमांक एमएच ३३ व्ही १७९७) त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघ...
बातम्या -
Chandrapur
- श्री. ज्ञानेश महाविद्यालयात मराठी अभ्यास मंडळाचे उद्घाटन; कादंबरीकार पवन भगत यांचे ते पन्नास दिवस या विषयावर मार्गदर्शनविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : मराठी कवितेत भाकरीचा चंद्र शोधणारी शब्दकळा नारायण सुर्वे यांनी आणली. त्यांनी कामगारांचे आणि कष्टकऱ्यांचे जीवन कवितेचा विषय बनविले. मानवी जीवनाकडे उन्नत दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी त्यांच्या कवितेतून मिळते. अस्सल जीवनानुभवातून निर्माण झालेली त्यांची कविता जीवननिष्ठा, मानवतावादी विचार आणि समाजाकडे पाहण्याची परिपक्व दृष्टी देणारी आहे. त्यामुळे नारायण सुर्वे यांची कविता अत्यंत उंचीची कविता असल्याचे मान्य करावे लागते, असे प्रतिपादन मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ. महेबुब सय्यद यांनी केले.सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील श्री. ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी अभ्...
बातम्या -
Chandrapur
- जलसंधारण, सिंचन, वृक्षलागवड व कृषी विकासावर भर; ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : खरीप हंगामात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच जलसंधारण, सिंचन क्षमता वाढविणे, वृक्षलागवड, चारा निर्मिती आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यावर विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका हमी अभियान (व्हीबीजी-राम-जी) अंतर्गत सन २०२६-२७ च्या वार्षिक नियोजन आराखड्यात एकूण २८ हजार ६८८ विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळी भागांमध्ये रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण पाया...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन आणि अभ्यासाची दिशा मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन अरुणा राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानसंपादनाची प्रेरणा देणे आणि स्पर्धात्मक युगात करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच त्यांच्या...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : स्वप्न पाहण्याची जिद्द, ती पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम आणि ज्ञान मिळविण्याची अखंड ओढ, हा संदेश देणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथील मोंटफोर्ट स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुस्तकांशी मैत्री करण्याचा आणि डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनातून शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून घेतला.विद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य ब्रदर प्रेम कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.शिक्षक घनश्याम बुरडकर यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती देताना त्यांच्या विचारांचे म...
बातम्या -
Chandrapur
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी उत्सव; अरुण नारायण तिखे प्रमुख अतिथी, मंगेशजी भेंडे प्रमुख वक्तेविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रपूर नगराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रामनगर येथील चांदा पब्लिक स्कूल येथे सायंकाळी ६.१५ वाजता होणार असून, या विजयादशमी उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून अरुण नारायण तिखे उपस्थित राहणार आहेत. ते माळी महासंघ या सामाजिक संघटनेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष व अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश म्हणून कार्यरत आहेत. तसेच प्रमुख वक्ते म्हणून मा. मंगेशजी भेंडे उपस्थित राहणार असून, ते अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख, रा. स्व. संघ आहेत.विजयादशमी हा हिंदू परंपरेतील महत्त्वाचा सण असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेत या उत्सवा...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मध्य चांदा वनविभागांतर्गत कोठारी वनपरिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या अध्यक्षांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. ताडोबाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक प्रभूनाथ शुक्ल यांच्या सहकार्याने आणि कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर यांच्या संकल्पनेतून हा दौरा आयोजित करण्यात आले होते.वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, जैवविविधतेचे व्यवस्थापन आणि वनांवर आधारित शाश्वत उपजीविकेच्या संधींबाबत प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे हा या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. वनव्यवस्थापनात स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग कशा प्रकारे वाढविता येईल, तसेच वनसंपत्तीचे संवर्धन करताना पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल, याबाबत समित्यांच्या अध्यक्षांना मार्गदर्शन करण्यात आले.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातील मह...