चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
- जिल्हाधिकायांनी निर्गमित केले आदेश- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध ठेवण्याचे नियेाजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये, तसेच पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक व विक्री करण्यास जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सक्त मनाई केली आहे. याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (बीएनएसएस) च्या कलम १६३ अन्वये आज ६ आदेश जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये ट्रीगर १ (प्रथम कळ) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच स...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : मुलाचे/ मुलीचे ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिले मॅडेटरी बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक असते. त्यानंतर वयाची १५ वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी लागते. या दोन्ही टप्प्यांवर एमबीयू वेळेत पूर्ण करणे पालकांसाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये वाढत्या वयानुसार मुलांचे हातांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि नवीन छायाचित्र आधारमध्ये नोंदविले जाते.एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित विविध सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊन आधार कार्ड रद्द देखील केले जाऊ शकते, त्यामुळे ५ ते १७ वयोगटातील मुलांचे आधार कार्ड त्वरीत अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.लहान मुलांसाठी आधार क्रमांक अतिशय महत्वाचा असून शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती, शाळेतील नोंदणी, तसेच विविध योजनांचा लाभ घेताना आधारचा वापर होत असल्याने पालकांनी आपल्या मुला...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कळमना उपक्षेत्राच्या संरक्षित वनखंड क्रमांक ५७२ मध्ये ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीचा वापर करून रानडुकराची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिवंत वीजप्रवाह सोडून तयार करण्यात आलेल्या सापळ्यात अडकून रानडुकराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वनविभागाने मध्य प्रदेशातील चार संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.५ ऑक्टोबरच्या रात्री शिकारीसाठी ११ केव्ही विद्युत वाहिनीवरून जिवंत वीजप्रवाह घेण्यात आला. बांबूच्या खुट्यांच्या साहाय्याने विद्युत तार वनक्षेत्रात टाकून शिकारीचा सापळा तयार करण्यात आला होता. या सापळ्याच्या संपर्कात आल्याने रानडुकराला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी हा प्रकार वनविभागाच्या निदर्शनास आला.घटनेची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील रवींद्र नगर, मौलाना आझाद नगर, राजेंद्र प्रसाद नगर आणि पंडित दीनदयाल नगर परिसरातील सुमारे २० हजार नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वनभूमीवरील घरांमध्ये वास्तव्य करीत आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या जमिनीचा अधिकृत पट्टा झालेला नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शहर विकास आघाडीने म्हटले आहे.सर्वे क्रमांक ३१/१ मधील वनभूमीवर १९८० पासून नागरिकांचे वास्तव्य असल्याचे आघाडीचे म्हणणे आहे. जमिनीचा पट्टा उपलब्ध नसल्यामुळे मागासवर्गीय कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घरबांधणीसाठी बँकांकडून गृहकर्ज मिळत नसल्याचीही समस्या आहे. पट्टा नसल्याने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत, तर जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक रहि...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पावसाने पाठ फिरवल्याने बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून, शेतशिवारातील पिके करपून शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. अशा परिस्थितीत बल्लारपूर तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर न करणे हा शेतकरी आणि शेतमजुरांवर अन्याय असल्याचा संताप व्यक्त करीत शहर विकास आघाडीने तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे.यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकांना आवश्यक पाणी मिळाले नाही. परिणामी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या रोजगारावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने केवळ शेतकऱ्यांचाच नव्हे, तर शेतमजुरांचाही विचार करून मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सकाळी कामावर गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत झाल्याने मोरवा परिसरावर शोककळा पसरली. नागपूर मार्गावरील ताडाळीजवळील केतन हुंदाई वर्कशॉपमध्ये मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. सारंग उर्फ मोहन कोयताडे २१ वर्षे रा. मोरवा, असे मृत कामगाराचे नाव आहे. सहकारी शुभम उमाटे २९ वर्षे यालाही मोहनला वाचविताना विजेचा धक्का बसला.नेहमीप्रमाणे मोहन आणि शुभम डेंटिंग-पेंटिंगच्या कामासाठी वर्कशॉपमध्ये आले होते. परिसरात अचानक दुर्गंधी येत असल्याने नेमके कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी टिनाच्या शेडवर चढून पाहणी सुरू केली. याचवेळी वर्कशॉपलगतच्या झाडाला लागून गेलेल्या जिवंत विद्युत तारेतून संपूर्ण झाडात वीजप्रवाह उतरल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. पाहणी करत असतानाच मोहनचा झाडाला स्प...
बातम्या -
Chandrapur
- ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूरच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम, भिवकुंड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, मार्गदर्शन, आवश्यक साहित्य व फळवाटप तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती व्हावी तसेच त्यांना सन्मानपूर्वक आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक आधार मिळावा, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. गौरव दांडेकर, भौतिक उपचार तज्ज्ञ डॉ. भारती गणवीर तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रमाचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत सरकारच्या राजपत्रातील प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश नसल्याच्या पार्श्वभूमीवर २०२७च्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्यासाठी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब, रफी मार्ग येथे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.या आंदोलनाच्या नियोजनासाठी यापूर्वी बेंगळुरू (कर्नाटक), नागपूर (महाराष्ट्र), हैदराबाद (तेलंगणा) आणि छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता दिल्लीतील बैठकीत हिवाळी अधिवेशनादरम्यान करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा, स्वरूप आणि पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.२०२७च्या जनगणनेत ओब...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील सर्वसामान्य आणि गरजू कुटुंबांना हक्काचे, परवडणारे घर मिळावे यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन बल्लारपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार घरकुले उभारण्याची मागणी केली. या प्रस्तावावर तातडीने प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याची मागणी त्यांनी केली असून, जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.बल्लारपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांसाठी परवडणाऱ्या घरांची गरज लक्षात घेऊन हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक कुटुंबांना परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून १ हजार घरकुलांचा प्रकल्प पुढे ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय येथे क्लेफ्ट लिप व पॅलेट (Cleft Lip and Palate) असलेल्या बालकांसाठी शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या विशेष तपासणी शिबिरास बालक व त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रे तसेच शाळांमध्ये बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान आढळून येणारे जन्मजात व्यंग, आजार, विकासात्मक विलंब तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांचे वेळेत निदान करून संबंधित बालकांना आवश्यकतेनुसार पुढी...