नवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी  :
तालुक्यातील  वेलगूर येथील गावाला लागून असलेल्या  तलावात प्रातःविधीसाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज ८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. 
 वेलगूर येथील तलावात  मासे पकडणे, कपडे धुणे  तसेच  प्रातःविधीला लोक जात असतात.     नियमितपणे नवेगाव येथील  ६५  वर्षीय इसम  सप्टेंबर रोजी सायंकाळला प्रातःविधीसाठी गेला असता रिमझिम पाऊस चालू होता.  त्यामुळे त्याचा पाय घसरल्याने पाण्यात तोल गेला व  पाण्यात पडला.  यावेळी तिथे कुणीही नसल्यामुळे त्याला वाचवू शकले नाही.  त्यातच त्याचा मृत्यू झाला.  आज त्यांचा मृतदेह तरंगताना आदळून आला. सदर घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी अहेरी पोलीस ठाण्यात दिली.  पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-08


Related Photos