महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी बातम्या - Chandrapur

वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी


- शेतातून बैलांसह घरी परतताना अचानक हल्ला; गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरूविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चेकसोमनपल्ली येथे सोमवारी ५ सायंकाळी शेतातून बैलांसह घरी परतणाऱ्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात रोजा शिवमोहन उराडे या महिला जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रोजा उराडे या सोमवारी सायंकाळी शेतातील काम आटोपून बैलांसह घराकडे परतत होत्या. याच वेळी शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यात त्या जखमी झाल्या.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले आणि जखमी रोजा उराडे यांना उपचारासाठी गोंडपिपर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विक्रीसाठी साठवलेला सुगंधित तंबाखू व सुपारी जप्त बातम्या - Chandrapur

विक्रीसाठी साठवलेला सुगंधित तंबाखू व सुपारी जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / भद्रावती : विजासन येथे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला १५ हजार ८८० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व सुपारीचा साठा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई नेताजीनगर, विजासन येथील नीता संजय चव्हाडे ४० वर्षे  यांच्या घरी करण्यात आली.पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित महिलेच्या घराची झडती घेतली. यावेळी घरात मजा १०८ कंपनीचे २० डबे सुगंधित तंबाखू आढळून आले. या तंबाखूची किंमत १४ हजार ८२० रुपये, तर १ हजार ६० रुपये किमतीची सुपारी असा एकूण १५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.विक्रीच्या उद्देशाने सुगंधित तंबाखू व सुपारीचा बेकायदेशीर साठा करून ठेवल्याप्रकरणी तसेच अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महिला आरोपी असल्याने पोलिसां...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वाघ गावाच्या वेशीवर : मात्र वनविभागाचा अलर्टच वाजेना बातम्या - Chandrapur

वाघ गावाच्या वेशीवर : मात्र वनविभागाचा अलर्टच वाजेना


- रत्नापूर परिसरात पट्टेदार वाघाचा वावर; शेतातील डस्टर पंप कुरतडून नेला, हायरायडर्स अलर्ट यंत्रणा ठरली निष्प्रभविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : परिसरातील रत्नापूरजवळ पट्टेदार वाघाने गावाच्या वेशीवर शिरकाव केल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हालचालींची पूर्वसूचना मिळावी, यासाठी वनविभागाने लावलेली हायरायडर्स अलर्ट यंत्रणा मात्र ऐनवेळी वाजलीच नसल्याने तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाघ प्रत्यक्ष शेतशिवारात दिसूनही अलर्ट यंत्रणा सक्रिय न झाल्याने गावकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. ही घटना सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.रत्नापूर येथील मारोती रामा ढोणे हे शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेले असता, शेतात ठेवलेला चार्जिंग डस्टर पंप त्यांना अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आला. वाघाने हा पंप कुरतडून काही अंतरापर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शेअर बाजारातील मोठ्या परताव्याच्या आमिषाने ९ लाख ९० हजारांचा गंडा बातम्या - Chandrapur

शेअर बाजारातील मोठ्या परताव्याच्या आमिषाने ९ लाख ९० हजारांचा गंडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शेअर बाजारात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून डब्ल्यूसीएल कर्मचाऱ्याची तब्बल ९ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुंतवणुकीवर तब्बल ७९ लाख ५९ हजार ४७० रुपये नफा झाल्याचे अँप वर दाखविण्यात आले. मात्र नफा तर मिळालाच नाही, उलट गुंतविलेली मूळ रक्कमही काढता न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी चंद्रपूर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.केशव रामदास पिंपळकर ५३ वर्षे हे डब्ल्यूसीएलच्या लालपेठ, चंद्रपूर येथील आस्थापनेत फोरमन पदावर कार्यरत आहेत. त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीची काहीशी माहिती असल्याने ते यापूर्वीही गुंतवणूक करीत होते. २० ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना फेसबुकवर शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राजुरात एटीएम फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : कार्ड बदलून सेवानिवृत्ताच्या खात्यातून हजारो रुपये लंपास बातम्या - Chandrapur

राजुरात एटीएम फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : कार्ड बदलून सेवानिवृत्ताच्या खात्यातून हजारो रुपये लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त व्यक्तीच्या एटीएम कार्डची अनोळखी व्यक्तीने चलाखीने अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ३७ हजार ८०० रुपये काढल्याची धक्कादायक घटना राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये घडली. या प्रकरणी श्रीहरी नारायण ठमके (वय ६३), रा. अंबादास वॉर्ड, राजुरा यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.ठमके हे सेवानिवृत्त असून कुटुंबासह राजुरा येथे राहतात. सोमवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता कौटुंबिक कामासाठी पैसे काढण्याच्या उद्देशाने ते आसिफाबाद रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये गेले होते. एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे निघत नव्हते.त्यावेळी एटीएममध्ये दोन व्यक्ती उपस्थित होते. काही वेळाने आणखी एक अनोळखी व्यक्ती तेथे आला. एटीएममध्ये कधीक...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शेतातून घरी परतताना महिलेवर वाघाची झडप : बैलांमुळे हल्ल्याचा डाव फसला बातम्या - Chandrapur

शेतातून घरी परतताना महिलेवर वाघाची झडप : बैलांमुळे हल्ल्याचा डाव फसला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी /  चंद्रपूर  : शेतातील काम आटोपून बैलांना घेऊन घराकडे परतणाऱ्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातल्याची थरारक घटना गोंडपिपरी तालुक्यातील चेक सोमनपल्ली शेतशिवारात सोमवार ५ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात रोजा शिवमोहन उराडे जखमी झाल्या असून, त्यांच्यावर गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रोजा उराडे या शेतातील काम आटोपून बैलांना घेऊन घराकडे परतत होत्या. यावेळी शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घेतली. वाघाच्या अचानक हल्ल्यामुळे बैल घाबरले आणि त्यांनी धाव घेतली. वाघाने एका बैलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र बैलांनी वेगाने धाव घेतल्याने वाघाचा डाव फसला. या गोंधळात वाघाच्या हल्ल्यात रोजा उराडे जखमी झाल्या.घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पंडित दीनदयाल वार्डात आढळला दुर्मिळ भारतीय सरडा : कारवा सफारी झोनमध्ये सुखरूप मुक्तता बातम्या - Chandrapur

पंडित दीनदयाल वार्डात आढळला दुर्मिळ भारतीय सरडा : कारवा सफारी झोनमध्ये सुखरूप मुक्तता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील पंडित दीनदयाल वार्ड परिसरात सोमवार ५ ऑक्टोबर रोजी दुर्मिळ भारतीय सरडा (Chamaeleo zeylanicus) आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. नागरिकांनी सरड्याला पकडून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आलम यांच्याकडे सोपविले. डॉ. आलम यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. घोरुडे यांना माहिती दिल्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.क्षेत्र सहायक रामसोच यादव, वनरक्षक अनिल चौधरी, वनमजूर नितेश बावणे व ओमकार पोहणे यांनी सरड्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. सरड्याला कोणतीही इजा होणार नाही, याची दक्षता घेत त्याला पुढील कार्यवाहीसाठी सुरक्षितपणे हलविण्यात आले.सहाय्यक उपवनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. घोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरड्याला कारवा-बल्लारशाह सफारी झोनमध्ये नेण्यात आले. तेथे त्याच्या नैसर्गिक...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
जनतेच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करा : बेबीताई उईके यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन बातम्या - Chandrapur

जनतेच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करा : बेबीताई उईके यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चंद्रपूर शहर जिल्हा संघटनेची मासिक संघटनात्मक बैठक पक्ष कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत शहरातील विविध प्रश्नांसह पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत MPSC विद्यार्थ्यांच्या समस्या, SIR प्रक्रियेदरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी तसेच स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना होत असलेला त्रास या विषयांवर पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय केला. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी, परीक्षा प्रक्रिया आणि शासनाच्या पातळीवर मांडावयाच्या प्रश्नांबाबतही चर्चा करण्यात आली.पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बूथस्तरापासून प्रभाग व वॉर्डनिहाय संघटन उभारणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
जिल्ह्यात एका दिवसात ११ दत्तक प्रकरणे निकाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दत्तक प्रक्रियेला गती बातम्या - Chandrapur

जिल्ह्यात एका दिवसात ११ दत्तक प्रकरणे निकाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दत्तक प्रक्रियेला गती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी ११ प्रलंबित दत्तक प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये चार नात्यांतर्गत दत्तक प्रकरणे, चार सावत्र दत्तक प्रकरणे आणि तीन अनाथ बालकांच्या दत्तक प्रकरणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एका अनाथ बालकाला युरोपमधील माल्टा येथील दत्तक इच्छुक पालकांचे छत्र मिळाले आहे.बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मध्ये सन २०२१ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार दत्तक प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.या तरतुदीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका क्र. ३२०६५/२०२२ दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ४ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ (सुधारित अधिनियम २...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शेतात काम करताना वाघाने घेतला जीव : आगरझरीत ६० वर्षीय महिलेचा करुण अंत बातम्या - Chandrapur

शेतात काम करताना वाघाने घेतला जीव : आगरझरीत ६० वर्षीय महिलेचा करुण अंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : रोजच्या जगण्यासाठी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी-२ बिटात आज सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मंदा सूर्यभान मंगाम (वय अंदाजे ६०), रा. आगरझरी या राखीव वन कक्ष क्रमांक १८७ लगत असलेल्या सर्व्हे क्रमांक १०/४ मधील स्वतःच्या शेतात शेतीची कामे करीत होत्या. दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच दुर्गापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे आण...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →