महत्वाच्या बातम्या

 हिवाळी अधिवेशनाकरिता तात्पुरत्या स्वरुपात पदे भरण्यात येणार


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर येथे होणा-या हिवाळी अधिवेशनासाठी लिपिक टंकलेखक आणि शिपाई  व संदेशवाहकांची तात्पुरत्या पूर्णतः हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत. लिपीक-टंकलेखकांची एकूण १० पदे आणि शिपाई व संदेश वाहकांची एकूण २४ पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लिपीक-टंकलेखक या पदाकरिता शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन ३० श. प्र. मि. व इंग्रजी टंकलेखक ४० श. प्र. मि. व संगणकाची एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण, वयाची अट खुला संवर्गासाठी १८ ते ३८ वर्षे, मागास वर्गासाठी वय १८ ते ४३ वर्षे (५ वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम) शिपाई, संदेश वाहकासाठी शैक्षणिक अर्हता चौथा वर्ग उत्तीर्ण किंवा उच्च अर्हता, वयाची अट खुल्या संवर्गासाठी वय १८ ते ३८ वर्षे, मागास वर्गासाठी १८ ते ४३ वर्षे ( ५ वर्षे नियमाप्रमाणे शिथीलक्षम) तसेच सायकल चालविता येणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ४ ते २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
अर्ज सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र. २, २ रा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४०००१ येथे स्वीकारण्यात येतील. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०७१२२५३१२१३ असा आहे. इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात अर्जाचा नमुना घेण्यासाठी येताना सोबत फोटो तसेच इतर शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. अर्जाचा विहित नमुना कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असल्याचे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार य उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी कळविले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos