कायद्याचा भंग केल्याने शहरातील तीन डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई : गडचिरोली पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात डीजे व डाल्बी वाजविल्याचे ध्वनी प्रदूषण मोजण्याच्या यंत्रावरून निष्पन्न झाल्याने २१ सप्टेंबर रोजी शहरातील तीन गणेश मंडळांवर कारवाई करून उपयोगात आणलेले डीजे/ डाल्बी चे साहित्य ,६ मोठे वाहन व ३ जनरेटर गडचिरोली पोलिसांनी जप्त केले आहे . 
२१ सप्टेंबर रोजी रात्री  युवा गणेश मंडळ फुटका मंदिर गडचिरोली , अनादी शशिकांत मंडल रा. रामनगर गडचिरोली ,  बाल गणेश मंडळ त्रिमूर्ती चौक गडचिरोली या मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात डीजे व डाल्बी वाजविल्याने ध्वनी प्रदूषण मोजण्याचे यंत्रावरून निष्पन्न झाले .  मंडळांनी पर्यावरण सरंक्षक कायदा १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनिमय व नियंत्रण) अधिनियम २००० चे भंग केल्याने यातील उपयोगात आणलेले डीजे/ डाल्बी चे साहित्य , ६ मोठे वाहन व ३ जनरेटर जप्त करण्यात आले असून ध्वनिप्रदूषण अधिनियमान्वये जिल्हा प्राधिकरणाकडे पुढील कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात आले आहे. 
सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे सा. यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड ,  स.पो.नि. उदार, पो.उप.नि. स्वप्नील लोहार, पो.उप.नि पाटील व पोलीस पथकाने केली आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-22


Related Photos