महत्वाच्या बातम्या

 अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घाला : आ. किशोर जोरगेवार


- पोलिस अधिक्षकांची भेट घेत केल्या सुचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील दारुबंदी उठल्या नंतर दारुबंदी व्यवसायात गुंतलेले गुणगारी प्रवृत्तीच्या गुंडांनी इतर अवैध व्यवसाय सुरु केले आहे. यात ऑनलाईन क्रिकेट जुगार चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे युवा वर्ग यात गुंतत असुन अनेकांनी आर्थिक नुकसाणीमुळे आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देत जिल्हात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घाला अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक  रविंद्रसिंग परदेशी यांना केल्या आहे.

रविंद्रसिंग परदेशी हे चंद्रपूर जिल्हाचे नवे पोलिस अधिक्षक म्हणून रुजु झाले आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन सदर सुचना केल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, घूग्घुस शहर संघटक विलास वनकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शाहा आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूरात अवैध व्यवसायाने पून्हा डोके उंचवायला सुरवात केली आहे. जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा, सट्टापट्टी, जुगार, क्रिकेट जुगार, अवैध वाहतुक, सुगंधीत तंबाखु या सारखे अनेक अवैध व्यवसाय फोफाऊ लागले आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर निर्माण झाला आहे. चंद्रपूरातील दारु बंदी उठल्या नंतर अनेक गुणेगारी प्रवृत्तीचे लोक अशा व्यवसायात गुंतल्या गेले आहे. जिल्हात ड्रग्स, गांजा विक्रीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा व्यवसायांवर अपेक्षीत अशी कार्यवाही होतांना दिसत नाही. राज्यात निर्बंध असलेल्या सुगंधीत तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. क्रिकेटवर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशांना सहज रित्या जुगार लावण्याचा मोबाईल ॲप्स उपलब्ध होत आहे. सदर ॲप्स उपलब्ध करुन देणाऱ्या बुकींवर पोलिस प्रशासनाने लक्ष ठेवत कार्यवाही करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्ष रविंद्रसिंग परदेशी यांना केल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पुष्प गुच्छ देत नव्या पोलिस अधिक्षकांचे स्वागत करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos