जागर शक्तीचा, जागर नारी शक्तीचा, सन्मान शक्तीचा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : मार्कंडा वनपरिक्षेत्रात 4 ऑक्टोबर 2022 जागर शक्तीचा जागर नारी शक्तीचा सन्मान शक्तीचा या कार्यक्रमाचे औचित्य साधून मार्कंडा वनपरिक्षेत्रातील अल्लापल्ली वनपरिक्षेत्रातील महिला अधिकारी कुमारी भारती बी राऊत वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा, कु आरती मडावी वनपरिक्षेत्र अधिकारी अहेरी व कुमारी अलोने वनपरिक्षेत्र अधिकारी पेंडीगुडम मूलचेरा यांच्या उपस्थितीत अल्लापल्ली वन विभागातील वनपरिक्षेत्र कार्यालय चामोर्शी घोट व अहिरे परिक्षेत्रातील महिला वनरक्षक उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्याने नारी सन्मान विषयी नारी म्हणजे विविध रूप आहे महिला पुरुषा बरोबरीने काम करते सरस्वती का रूप है नारी लक्ष्मी का स्वरूप है नारी बडजाता है जो अत्याचार काली दुर्गा के अनुरूप होणारी अशा शब्दात उल्लेख करून सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी वि. डी. तीमाडे वनरक्षक यांनी केले. अशाप्रकारे वन्यजीव सप्ताह निमित्त व नवरात्र निमित्त महिला कार्यक्रम राबविला.
News - Gadchiroli