महत्वाच्या बातम्या

 दैनंदिन साफसफाई करीता निविदा आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथील कार्यालयीन इमारत, कार्यालयीन परिसर, प्रत्येक मजल्यावरील पुरुष व महिला प्रसाधनगृहांची दैनंदिन साफसफाई तसेच इत्यादी कामाकरिता मनुष्यबळ आणि साहित्य/ सामुग्री पुरविण्यासाठी सन २०२६-२७ या वर्षासाठी लिफाफा बंद निविदा मागविण्यात येत आहे.

सेवा पुरवठा कंत्राटदार /सेवा संस्थांनी २५ नोव्हेंबर २०२६ पर्यत कार्यालयीन वेळेत दुपारी ३ वाजेपर्यत प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे निविदा सादर करावी. या संदर्भातील अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक तपशील, निविदा फॉर्मवर कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहे व कार्यालयात उपलब्ध आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos