महत्वाच्या बातम्या

 ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  १५ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वर्षभरापूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते.

डॉक्टर नानगाथ कोत्तापल्ले यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा यांसह विविध प्रकारात त्यांनी साहित्य निर्मिती केली होती. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरुही होते.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी २९ मार्च १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला. देगलुर इथे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी घेतले. बीए आणि एमए परीक्षेत त्यांनी मराठवाडा विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच कुलपतींच्या सुवर्णपदकाने त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९८० मध्ये त्यांनी शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर शोधप्रबंध लिहून पीएचडी संपादन केली होती. त्यांनी बीडमधील महाविद्यालयात १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणूनही काही काळ काम केले.





  Print






News - Rajy




Related Photos