महत्वाच्या बातम्या

 चोप येथे आजपासून संगितमय श्रीमद भागवत ग्रामगिता तत्वज्ञान सप्ताहाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : भागवत ग्रामगिता तत्वज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरूदेव सेवा मंडळ तथा चोप वासीयांच्या वतीने १ डिसेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत संगितमय श्रीमद भागवत ग्रामगिता तत्वज्ञान सप्ताहाचे आयोजन दत्त मंदिराच्या सभागृहात करण्यात आले आहे. भागवत सप्ताहात नागपूरचे श्री हभप शंकराव कावळे महाराज यांच्या अमृतवाणीतुन प्रवचन होणार आहे. 

सदर भागवत सप्ताहाची सुरूवात १ डिसेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता दिपप्रज्वलाने करण्यात येणार आहे. दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ५ वाजता सामुदायिक ध्यान प्रार्थना, सकाळी ७ वाजता रामधुन, ९ ते ११ वातजा प्रवचन ह.भ.प.  कावळे महाराज, सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी ७ वाजता हरीपाठ, रात्री ९ ते ११ वाजता प्रवचन ह.भ.प. कावळे महाराज तर ५ डिसेंबरला दुपारी १ वाजता महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, ७ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता गोपालकाला, सायंकाळी ५ वाजतापासून महाप्रसाद असणार आहे. भागवत सप्ताहाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरूदेव सेवा मंडळ दत्त सांप्रदाय मंडळ ओम शारदा उत्सव बाल दुर्गा उत्सव बाल गणेश उत्सव मंडळ व समस्त ग्रामवासीय जणतेंनी केला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos