महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठात विज्ञान विभागातर्फे दीक्षांत समारंभाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान विभागातर्फे एम.एस्सी. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला. एम.एस्सी. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना विद्यापीठातील प्रत्येक घटकाची माहिती व ओळख व्हावी तसेच त्यांना विद्यापीठातील नवीन वातावरणाशी जुळवून घेता यावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे तर प्रमुख अतिथी म्हणून गणित विभागप्रमुख डॉ. शैलैंद्र देव, संचालक शारीरिक शिक्षण विभाग डॉ.अनिता लोखंडे, डॉ.सुनिल बागडे, डॉ. संदीप कागे, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र-कलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, अभ्यास करताना प्रत्येक गोष्टीला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे.वाचनात सातत्य ठेवून भविष्यातील संधीबाबत विचार करायला हवाय. असे म्हणत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. शैलैंद्र देव म्हणाले, विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे व विद्या ग्रहण करण्याचे व्यसन असायला हवे. असे मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनील बागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रत्येक प्राध्यापकांचा  परिचय करून दिला. विद्यापीठातील प्राध्यापकांनी आपल्या विषय व विभागाची माहिती  विद्यार्थ्यांना दिली. नंतर ग्रंथालय विभाग तसेच शारीरिक शिक्षण विभागाची माहिती तसेच विद्यापीठितर्फे चालवण्यात येणाऱ्या इतर उपक्रमांची तसेच अभ्यासेत्तर उपक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्टुडंट प्लेसमेंट आदी उपयुक्त उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक स्वांता गुरूनुले, संचालन प्रविण पोडशेट्टी व मयुरी कारडे, आभार शुभम झगडकर हिने केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos