महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


८ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१८८९ : मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.

१८९५ : दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.

१९३२ : अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.

१९३९ : म्युनिक येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.

१९४७ : पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

१९६० : अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९८७: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.

१९९६ : कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.

२००२ : जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०१६ : तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.

२०१६ : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

८ नोव्हेंबर जन्म

१६५६ : खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म. धूमकेतूची कक्षा मोजणारे पहिले शास्रज्ञ. (मृत्यू: १४ जानेवारी १७४२)

१८३१ : भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १८९१)

१८६६ : ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९४१)

१८९३ : थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९४१)

१९०९ : स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९८)

१९१७ : कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०००)

१९१९ : प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००० – पुणे)

१९२० : भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१४)

१९२७ : भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म.

१९५३ : भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)

१९७० : मायस्पेस चे सहसंस्थापक टॉम एंडरसन यांचा जन्म.

१९७४ : नारुतो चे जनक मसाशी किशिमोतो यांचा जन्म.

१९७६ : ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली यांचा जन्म.

१९२३ : पहिल्या इंटिग्रेटेड सर्किटचे निर्माता जॅक किल्बी यांचा जन्म (मृत्यू : २० जून २००५)

१९०८ : भारतीय लेखक, प्राध्यापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजा राव यांचा जन्म (मृत्यू : ८ जुलै २००६)

८ नोव्हेंबर मृत्यू

१२२६ : फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर ११८७)

१६७४ : कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १६०८)

१९६० : भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.

२०१३: भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९५७)

२०१५ : भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९१९)

२०१५ : उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगद पॉल यांचे अपघाती निधन.

२०२२ : भारतीय कन्नड अभिनेते लोहितस्वा यांचे निधन (जन्म: ५ मे १९४२)

२००९ : रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते विटाली गिन्झबर्ग यांचे निधन (जन्म: ४ ऑक्टोबर १९१६)

१९३५ : पहिले ट्रान्स-पॅसिफिक अमेरिका ते ऑस्ट्रेलिया उड्डाण पूर्ण करणारे ऑस्ट्रेलियन वैमानिक चार्ल्स किंग्सफोर्ड स्मिथ यांचे निधन (जन्म: ९ फेब्रुवारी १८९७)

१८१४ : क्रॉमफोर्ड कालव्याचे बांधकार, इंग्रजी अभियंते विल्यम जेसॉप यांचे निधन (जन्म: २३ जानेवारी १७४५)

२०२२ : भारतीय कन्नड अभिनेते लोहितस्वा यांचे निधन (जन्म: ५ मे १९४२)

२००९ : रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते विटाली गिन्झबर्ग यांचे निधन (जन्म: ४ ऑक्टोबर १९१६)

१९३५ : पहिले ट्रान्स-पॅसिफिक अमेरिका ते ऑस्ट्रेलिया उड्डाण पूर्ण करणारे ऑस्ट्रेलियन वैमानिक चार्ल्स किंग्सफोर्ड स्मिथ यांचे निधन (जन्म: ९ फेब्रुवारी १८९७)

१८१४ : क्रॉमफोर्ड कालव्याचे बांधकार, इंग्रजी अभियंते विल्यम जेसॉप यांचे निधन (जन्म: २३ जानेवारी १७४५)





  Print






Related Photos