जेप्रा येथील धानाचे पुंजने जळून राख : गावातील दुसऱ्या घटनेने खळबळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या जेप्रा येथील बाबुराव चुधरी यांच्या शेतातील दोन धानाचे पुंजने जळाल्याची घटना ०२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. याच गावातील हि दुसरी घटना असल्याने जेप्रा गावात खळबळ माजली आहे. सदर घटनेने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ३ एकर
प्राप्त माहितीनुसार, जेप्रा येथील बाबुराव चुधरी यांची ३ एकर शेती आहे. त्या शेतात धानाची शेती करण्यात आली होती, नुकतेच धान कापण्यात आले होते. ०२ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास दोन्ही धानाच्या पुंजण्यास आग लागली यात संपूर्ण धान राख झाले. सदर घटनेने मात्र धान मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अज्ञात इसमाने धान पुंजण्यास आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाच्या वतीने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. तर धानाचे पुंजने जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध लावून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहे. यापूर्वी 30 नोव्हेंबर रोजी जोगेशवर गुंफलवार यांच्या शेतातील धानाचे पुंजने जळाल्याची घटना घडली होती. गावातील हि दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये पुंजने जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तीबद्दल रोष व्यक्त होत आहे.
News - Gadchiroli