३० सप्टेंबर रोजी तृतीयपंथीयांसाठी शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत सन २०२५-२०२६ मध्ये तृतीयपंथीय समुहातील व्यक्तींचा सर्वागीन विकास व्हाया यासाठी जिल्ह्यात विविध शिबिराचे आयोजन मोहिम राबविणे, जाणिव जागृती कार्यशाळा, प्रचार प्रसिध्दी, स्वयंरोजगार मेळावे, उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्य शिबिराचे आयोजन तसेच तृतीयपंथीय व्यक्तींसाठी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याकरीता कृति काराखडा तयार करण्यासाठी सामाजिक न्याय भवन येथे ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आलेआहे. या शिबिरास तृतीय पंथीय समुहातील व्यक्तींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यातआले आहे.




Petrol Price




