महत्वाच्या बातम्या

 अपघाताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच भरधाव कारने चिरडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत २१ कि.मी. अंतरावर नवाकुड शिवार, ए. एच. ७५३ खंडेलवाल मँगनीज कंपनी जवळ २३ नोव्हेंबर २०२२ चे ९.०० वा. दरम्यान कार क्र. एम एच ४० / सी एच ६३९३ चा चालक आरोपी रोशन रामदास पाटील, (३२) रा. आंबेडकर नगर वार्ड नं. ०१ चिचोली खापरखेडा व त्याच्या सोबत मित्र कुणाल शेंडे, रा. पांजरा, याच्या सोबत रामटेक येथील साई सबुरी बारमध्ये दारू पिवुन दारूच्या नशेत कार चालवत भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून नमुद घटनास्थळी कर्तव्यावर हजर असलेले पोलीस हवालदार जयत शेरेकर, हे अपघाताच्या घटनेचा मोका पंचनामा करीत असतांना आरोपी कार चालकाने पोलीसासह ०८ लोकांना उडविले. यात एक पोलीस हवालदार मृतक जयंत विष्णु शेरेकर, (४२) रा. रताळा कामठी व ०७ जण गंभीर जखमी झाले. मृतक पोलीस स्टेशन पारशिवनी येथे कार्यरत होते. यातील जखमी चंद्रप्रकाश टेकाडे (३२), अमोल कनीजे (३०) रा. पारशिवनी, विक्रसिंग भैस (४५) रा. नयाकुंड, आकाश कोलांडे, (२५) रा. मेहंदी, संदीप तिजारे (३५) रा. मेहदी, गौरव पनवेलकर (३२) रा. पारशिवनी, सागर सायरे (३८) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविदयालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले, असून उपचार सुरु आहे.

सदर गुन्हयातील आरोपी कारचालक हा अपमान झाल्यानंतर जखमींना मदत न करता मोक्यावरून पळून गेला व फरार होण्याचे तसेच अटक टाळण्याच्या उद्देशाने नातलगांच्या घरी लपून राहिला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन ला सादर केल्याने आरोपीला गुन्हयात अटक करण्यात आले. आरोपीचा ग्रामीण रूग्णालय पारशिवनी येथून मद्यप्राशन केलयाबाबतची तपासणी करण्यात आली. असुन वैद्यकीय अहवालात आरोपीने मद्यप्राशन केल्याबाबत नमुद केलेले आहे. गुन्हयाचे अधिक तपासात आरोपी तसेच त्याच्यासह कारमध्ये बसलेला त्याचा मित्राला गुन्हयासंबंधित विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, त्यांनी त्याच्या मित्रासह खिंडसी, रामटेक व मनसर येथील बियर बारमध्ये मद्यप्राशन केले व मद्याच्या अंमलात भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे एखादयाचा जिव जादू शकतो, याची पुरेपुर जाणीव असतानासुद्धा अपघातामुळे रोडवर दुर वाहनाच्या रांगा लागून रोडवर लोकांची गर्दी जमा झाल्याचे व त्यामुळे वाहतुक कोंडी होवुन पोलीस यंत्रणा सदर वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसुन सुद्धा आरोपीने मद्यप्राशन करून आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून रोडवरील गर्दीतल्या लोकांना व कर्तव्यावरील पोलीसांना धडकविले. ज्यामुळे एका पोलीसाचा मृत्यु झाला. तसेच ४ नागरीक गंभीर व किरकोळ जखमी झाले. तसेच आरोपीने गर्दीतील लोकांना धडक दिल्यानंतर आरोपीने त्याचे वाहन पुढे रस्त्याच्या कडेला उभे असलेले महिंद्रा बोलेरो के एम. एच. / ४० ए.आर. | २७६६ ला मागुन धडक देवून सदर वाहनाचे नुकसान केले असल्याने सदर गुन्हयात स्टे डा. क्र. २७/२२ वेळ ५.१८ वा. भादविचे कलम ३०४(अ) ऐवजी भादविचे कलम ३०४( भाग ०२) व ४२७ अन्वये कलमवाह करण्यात आलेले आहे. आरोपीला न्यायालयातुन ०५ दिवस पोलीस कोठडी मिळाली असुन गुन्हयाचा पुढील तपास नागपुर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोनवणे पोलीस स्टेशन पारशिवनी मॉक ७०२०५७७४५९ हे करीत आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos