बेला-दवडीपार फाटा परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

- परमात्मा एक पानठेल्यावर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : बेला-दवडीपार फाटा परिसरातील परमात्मा एक पानठेल्यावर अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई करून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी धीरज देवाजी लुटे ३५ वर्षे रा. आंबेडकर वॉर्ड, बेला याच्याविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा विभागाचे पथक २३ सप्टेंबर रोजी रात्री ९.५० ते ११.३० वाजताच्या दरम्यान बेला-दवडीपार फाटा परिसरात कारवाईसाठी गेले होते. या वेळी संशय आल्याने परमात्मा एक पानठेल्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आल्याने पथकाने तो जप्त केला.
या कारवाईनंतर पूजा लोकनाथ बोरकर यांच्या तक्रारीवरून संबंधिताविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वितरण रोखण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाकडून वेळोवेळी तपासणी व कारवाई केली जाते. बेला परिसरातील या कारवाईमुळे पानठेल्यांवर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नवखरे करीत आहेत. जप्त करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा साठा, त्याचा स्रोत आणि विक्रीसंदर्भातील बाबींचा तपास केला जात आहे.




Petrol Price




