अहेरीत गरबा दांडिया व बतकम्माची धूम्म!

- नवरात्रौत्सवा निमित्य स्पर्धेचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : येथील आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या राजवाड्यातील नवदुर्गामाता नवरात्रोत्सवा निमित्य बुधवार १४ ऑक्टोबर रोजी डी. बी. ए. स्कूलच्या पटांगणात भव्य गरबा दांडिया व बतकम्मा सर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्धेचे उदघाटन सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी रंगमंचावर युवा नेते हर्षवर्धन राव बाबा आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस चे (अजित पवार गट)प्रदेश सरचिटणीस पुष्पाताई अलोणे, तालुकाध्यक्षा सारिका ताई गडपल्लीवार, अँड स्वाती जैनवार, समता मडावी, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
दांडीया गरबा व बातकमा स्पर्धेत एकूण दहा गृप सहभागी झाले होते. यात दांडिया नृत्यात एकता ग्रुप अहेरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविले तर एस. एस. बीट बुस्टर गृप सिरोंचा द्वितीय तर काशवी ग्रूप अहेरी यांचा तृतीय क्रमांक आला. प्रोत्साहन पर बक्षीस डी. गर्ल्स ग्रुप अहेरी यांना देण्यात आले. बातकम्मा स्पर्धेत बंगारामा ग्रुप अहेरी यांनी प्रथम तर द्वितीय क्रमांक जगदंबा गृप यांनी मिळविले.
विजेत्या स्पर्धकांना आकर्षक रोख रक्कम, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे संचालन राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे (अजित पवार गट)अहेरी तालुकाध्यक्ष प्रणाली दुर्गे व सुरेंद्र अलोणे यांनी केले. यावेळी भक्त व भाविकगण, प्रेक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने होते.




Petrol Price




