रानमांजराचे शिकारी गडचिरोली वनविभागाच्या जाळ्यात


- जिल्ह्यातील पहिलीच घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / गडचिरोली
: जंगलात रानमांजरांची शिकार करून विक्रीसाठी नेणाऱ्या शिकाऱ्यांना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. विशेष म्हणजे रानमांजराचे शिकारी गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच वनविभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
पितांबर रूषी सुरपाम, दिवाकर पत्रु मेश्राम, सोमेश्वर दामोदर कांबळे, दामोदर देवाजी शेरकी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
काल १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.3३०  वाजता सदर कारवाई करण्यात आली. वनपरीक्षेत्र अधिकारी डी.व्ही. कैलुके, मानद वन्यतीव रक्षक मिलींद उमरे हे  पुलखल, मुडझा परिसरात वन्यजीव विषयक पाहणी करीत असताना मुडझाा येथे काही इसम बांबूचे वास्ते विकताना दिसले. वनपरीक्षेत्र अधिकारी व इतरांनी वाहनातून उतरून त्या इसमांकडे धाव घेतली. यावेळी ते इसम पळून गेले. बांबूचे वास्ते ताब्यात घेताना एका प्लाॅस्टिकमध्ये प्राण्याचा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह बाहेर काढला असता ते रानमांजर असल्याचे आढळून आले. रानमांजर हे प्राणी वन्यजीव अधिनियम १९७२ चे शेड्यूल दोनमध्ये येत असून या प्राण्याची शिकार करणाऱ्यास तीन ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा व दहा हजार रूपये दंडाची तरतूद आहे. 
घटनेवेळी दोन इसम जवळच आढळून आले. त्यांना ताब्यात घेवून विचारणा केली असता ते ग्राहक असल्याचे सांगितले. आरोपींपैकी एकाला ओळखत असल्याचेही त्यांनी सांगितले. वनपरीक्षेत्र अधिकारी कैलुके यांनी सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे फिरवून आरोपींना अटक केली. 
सदर कारवाई मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. आय. यटबाॅन, उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात क्षेत्रसहाय्यक पी.ए. जेणेकर, क्षेत्रसहाय्यक काळे, कवडो, बोढे, भसारकर, चव्हाण, राठोड, ठाकरे, दिकोंडावार, मट्टामी, कोडापे, खोब्रागडे व कर्मचार्यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-17


Related Photos