महत्वाच्या बातम्या

 अभ्यासिकेच्या माध्यमातून आदर्श पिढी निर्माण होईल : माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम


- आलापल्ली येथे चाणक्य अभ्यासिकेचे (वाचनालय) थाटात उद्घाटन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आलापल्ली : विद्यार्थ्यांसाठी आलापल्ली सारख्या ग्रामीण भागात सुरू केलेल्या अभ्यासिकेमुळे आदर्श पिढी निर्माण होईल. अभ्यासिका म्हणजे आदर्श पिढी निर्माण करण्याचा कारखाना आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल केले. चाणक्य अकॅडमीचे संचालक तथा मार्गदर्शक जुगल बोम्मनवार यांनी श्रीराम चौक आलापल्ली येथे सुरू केलेल्या नवीन अभ्यासिकाचे उदघाटन 10 ऑक्टोबर रोजी त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते उद्घाटक मनुन बोलत होते, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते अवधेशराव आत्राम, प्रवीणराव बाबा सहा. पोलीस निरीक्षक मोतीराम मडावी, डॉ चरणजीतसिंह सलूजा आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका काळाची गरज असून अभ्यासिकेच्या माध्यमातून युवकांना देश सेवा करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एवढेच नव्हे तर चाणक्य अकॅडमी तर्फे सुरू केलेली अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असून अभ्यासिकेमुळे गरीब विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. गडचिरोली सारख्या आदिवासीबहुल भागात पुणेरी पॅटर्न अभ्यासिका सुरू केल्याने येथील विध्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होणार असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आवाहन केले.


चाणक्य अकॅडमी ठरत आहे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा गुरु

चाणक्य अकॅडमी अहेरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना 18 सप्टेंबर 2016 रोजी झाली. सुरुवातीला 78 विद्यार्थी प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेतली तर आजतागायत 500 पेक्षा अधिक विद्यार्थी मार्गदर्शन घेतले असून आतापर्यंत बरेच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यात 2018 च्या पोलीस भरतीत एकूण 3 विद्यार्थ्यांची निवड झाली. तर,1 एम एम एफ व 1 आर्मी तसेच 1 विद्यार्थ्याची तलाठी म्हणून निवड झाली.तर 2019-20 मध्ये कोरोना महामारीमुळे ऑनलाइन क्लासेस घेण्यात आले.तर नुकतेच झालेल्या पोलीस भरती मध्ये येथील 4 विद्यार्थ्यांची निवड झाली.

एवढेच नव्हे तर चाणक्य अकॅडमी तर्फे विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र घेण्यात येत आहे. आलापल्ली येथे पुणेरी पॅटर्न अभ्यासिका नंतर आता पुढील काळात सिरोंचा, भामरागड आणि मुलचेरा तालुका मुख्यालयात शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे चाणक्य अकॅडमीचे संचालक तथा मार्गदर्शक जुगल बोम्मनवार यांनी आपले मत व्यक्त केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos