महत्वाच्या बातम्या

 सर्पदंशाने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू


- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू; गोंदिया शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्रिशा महेंद्र मेश्राम ४ वर्षे, रा. कुंडा, ता. किरणापूर असे मृत मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी त्रिशाला सर्पदंश झाला होता. सर्पदंश झाल्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान, उपचार सुरू असतानाच १ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता त्रिशाचा मृत्यू झाला. चार वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुंडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.





  Print






Related Photos