यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची घाटन्जीत रंगत वाढली


- सोसायटी मतदारसंघातून पाच उमेदवार रिंगणात; ३० सप्टेंबर नंतर अंतिम चित्र होणार स्पष्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : पोलीसनामा अयनुद्दीन सोलन्की यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने घाटंजी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुकानिहाय सोसायटी मतदारसंघातून तब्बल पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची चुरस वाढली असून, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखे कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३० सप्टेंबरनंतरच घाटंजी सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
घाटंजी तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून भाजप गटाकडून निलेश अशोक कोठरी, काँग्रेस गटाकडून अरविंद निळकंठराव भुरे, शिवसेना शिंदे गटाकडून आशिष सुरेशबाबू लोणकर, तसेच निशांत अरुण देठे आणि अनंत कौतूकराव गाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे सध्या पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून बन्क निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघाला महत्त्वाचे स्थान असल्याने या निवडणुकीकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व मतदारांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित उमेदवारांकडून मतदार संस्थांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न सुरू आहे.
माघारीनंतर समीकरणे बदलणार -
सध्या पाच उमेदवार रिंगणात असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत अद्याप शिल्लक आहे. ३० सप्टेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, त्यापूर्वी राजकीय व सहकार क्षेत्रात विविध स्तरांवर चर्चा आणि बैठका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोण उमेदवारी कायम ठेवणार आणि कोण माघार घेणार, यावर अंतिम लढतीचे स्वरूप अवलंबून राहणार आहे. सहकारी संस्थांच्या मतदारसंघात प्रत्येक मताला महत्त्व असल्याने उमेदवारांकडून मतदार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत घाटंजी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
पाच उमेदवारांमध्ये कोण राहणार कायम -
सध्याच्या स्थितीत पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी अंतिम लढतीत किती उमेदवार राहतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही. भाजप गटाकडून निलेश अशोक कोठरी यांची उमेदवारी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी इतर उमेदवारांच्या भूमिकेबाबत अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे माघारीच्या अंतिम तारखेपर्यंत निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकीतील उमेदवारांची संख्या स्पष्ट होईल. त्यानंतर प्रचाराला अधिकृतपणे वेग येऊन सहकारी संस्थांच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून संपर्क मोहीम राबविली जाण्याची शक्यता आहे.
३० सप्टेंबरनंतर चित्र स्पष्ट -
घाटंजी तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून सध्या पाच उमेदवार मैदानात असल्याने निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. मात्र, अंतिम लढत कोणाकोणात होणार, हे ३० सप्टेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवसाकडे सहकार क्षेत्रासह तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. माघारीनंतर कोणती समीकरणे तयार होतात आणि निवडणुकीला कोणते स्वरूप प्राप्त होते, याकडे आता घाटन्जी तालुक्याचे लक्ष आहे.




Petrol Price




