महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्हयात ३ हजार जागा भरण्यासाठी १० डिसेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /  नागपूर : जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर ३ हजारांच्या आसपास जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन कौशल्य विकास विभागाने केले आहे. सुशिक्षित बेरोजगारानी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हयातील औद्योगिक आस्थापनांना आवश्यकतेनुसार लागणारे मनुष्यबळ तसेच गरजु बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर या कार्यालयामार्फत १० डिसेंबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर येथे सकाळी १०.०० वजता कुशल/अकुशल उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून बेरोजगार युवक युवतीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून विविध प्रकारची पदे भरावयाचे आहेत. यामुळे नागपूर जिल्हयातील अंदाजे ३ हजारच्या आसपास रिक्त जागांचा समावेश आहे. या माध्यमातून बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

नागपूरातील नामांकित कंपन्या यांनी मोठया प्रमाणवर त्याकडील रिक्त पदे विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या रोजगार महास्वयम संकेतस्थळावर नोंदविले आहे. जिल्हयातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वरील संकेतस्थळावर नोंदणी केली नसेल त्यांनी तत्काळ नोंदणी करुन माहिती अद्ययावत करावी व ऑनलाईन पसंतीक्रम दर्शवून या संधीचा लाभ घ्यावा.

रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी औद्योगिक आस्थापनांनी उपस्थीत राहून संधीचा लाभ घ्यावे. जेणेकरुन बेरोजगार उमेदवारांनी शैक्षणीक पात्रता व अनुभवानुसार नोकरीची संधी प्राप्त होईल. तसेच औद्योगिक आस्थापनांना देखील आवश्यक मनुष्यबळ प्राप्त होऊ शकेल, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र. गं. हरडे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos