महत्वाच्या बातम्या

 स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली शेगाव येथे शेतकरी शेतमजुरांचा आसूड मोर्चा


- मोर्चात हजारो शेतकरी सहभागी

- शेगावात तहसील वर धडकला स्वाभिमानीचा आसूड मोर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / बुलडाणा : जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये मुसळधार पाऊस पडलेला असतांना तरी देखील हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रति आस्था दाखवत नाही. शेतकरी देशोधडीला लागला असतांना अनेक संकटाचा सामना शेतकरी करत आहे त्यासाठी शेगाव तहसीलवर विराट आसूड मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटना कडून काढण्यात आला त्यात ओला दुष्काळ जाहीर करा, पीक विमा विना अट अदा करा, शेतमजुरांना दरमहा मानधन द्या. ह्या मागण्या प्रामुख्याने रेटण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मोर्चा ला सुरवात करण्यात आली या मोर्चा मध्ये हजारो शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली शेगाव तहसील वर हा मोर्चा धडकला असून मागण्या जर मान्य झाल्या नाही तर मंत्र्याची दिवाळी साजरी होऊ देणार नाही. असा इशारा विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी सरकारला दिला.

  Print


News - Rajy
Related Photos