महत्वाच्या बातम्या

 अखेर बसपाच्या नगरसेविकेला मिळाली केबिन : मनपा मुख्यालयात कार्यालयाचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत बहुजन समाज पक्षाच्या नगरसेविकेला अखेर स्वतंत्र केबिन उपलब्ध झाली आहे. प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका तथा बसपा गटनेत्या सोनिया प्रशांत उंदीरवाडे यांच्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुख्य कार्यालयाच्या तळमजल्यावर केबिन उपलब्ध करून दिली. या कार्यालयाचे ३ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर लोकसभा प्रभारी धर्मेश निकोसे होते. उद्घाटनप्रसंगी बसपाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, लोकसभा प्रभारी तथा बल्लारपूर विधानसभा प्रभारी राजेश ब्राम्हणे, प्रशांत उंदीरवाडे आणि नगरसेविका सोनिया प्रशांत उंदीरवाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासह नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार आहे.

कार्यक्रमाचे संचालन बसपाचे शहराध्यक्ष इंजि. विमित कोसे यांनी केले, तर प्रा. अखिल निमगडे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा, विधानसभा व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महानगरपालिकेतील नगरसेवक, आयुक्त, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos