महत्वाच्या बातम्या

 घाटन्जी तालुक्यात ४७ लक्ष ४१ हजार रुपयाचा गान्जा जप्त : आरोपी विरुद्ध घाटन्जी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अन्तर्गत गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
अयनुद्दीन सोलन्की / घाटन्जी : घाटंजी तालुक्यातील कुंभारी शेत शिवारात ०९ आक्टोम्बर रोजी १२.४५ वाजता, आपल्या आर्थिक फायद्यासाठी गांज्याची लागवड केल्या प्रकरणी राजु रामाजी सलाम (४२ वर्षे, रा. कुंभारी ता. घाटंजी) विरुद्ध घाठन्जी पोलीस ठाण्यात अपराध क्रमान्क ८९८/२०२६ कलम ८ (B), २० (A) एन. डी. पी. एस. कायद्यानुसार गुन्हा नोन्दविण्यात आला आहे. सदरचा गुन्हा फिर्यादी सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन राठोड यांच्या तक्रारी वरुन दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा पोलीस हवालदार नितीन जैस्वाल यान्नी कायमी केला आहे. सदर प्रकरणाचा तपास घाटन्जीचे ठाणेदार, व तथा पोलीस निरिक्षक केशव ठाकरे (POLICE INSPECTOR KESHAV THAKRE) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरिक्षक विनाश जाधव हे करीत आहे.

दरम्यान, सन्शयीत आरोपी राजू सलाम यांचे शेतातून २३७ किलो ५० ग्रम, ४७ लक्ष ४१ हजार रुपये किंमतीचा गान्जा जप्त करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

यातील आरोपी राजू रामाजी सलाम याने आपल्या शेत गट क्रमाक ९७ मौजा कुम्भारी येथे स्वतः च्या फायद्यासाठी गान्जाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलीसान्ना मिळाली. त्यावरुन घाटन्जी पोलीस स्टाप, पन्च, राजपत्रीत अधिकारी, मापारी व फोटोग्राफर असे सदर शेतात जाऊन छापा टाकला असता, सदर शेतामध्ये गान्जा सदृश वनस्पतीची अवैध रित्या लागवड केल्याचे पोलीसान्ना दिसून आले.

त्यावेळी तुरीच्या ९ ओळीपैकी पहील्या ओळीत २३७ झाडे, दुसऱ्या ओळीत १४३ झाडे, तिसऱ्या ओळीत १९८ झाडे व ९ व्या ओळी पर्यन्त असे एकूण ८४८ गान्ज्याची झाडे मिळुन आली. पन्च व मापारी यांच्या समक्ष उपलब्ध वजन काट्यावर वजन केले असता २३७ किलो ५० ग्रम वजन भरले. ज्याची एकूण किंमत ४७लक्ष ४१ हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तो गान्जा पन्चासमक्ष जप्त करण्यात आला. 

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप निरिक्षक विनाश जाधव करीत आहे.





  Print






Related Photos