महत्वाच्या बातम्या

 सर्व मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मोबाईल कॉलिंगवरून फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. बोगस मोबाईल नंबरमुळे अशा लोकांना ओळखणे कठीण होते. मोबाईल कॉलिंगद्वारे होणाऱया फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीत असून सर्व मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडण्यात येणार आहेत.

केंद्र सरकार आणि ट्राय संयुक्तपणे एक नकीन प्रणाली सुरू करणार आहेत, ज्यामध्ये कॉलरचा फोटो त्याच्या मोबाइल नंबरसह दिसेल. यासाठी मोबाईल नंबर केवायसी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. दोन प्रकारच्या प्रणाली लागू केल्या जातील. पहिली आधार कार्ड आधारित आणि दुसरी सिम कार्ड आधारित.

ट्रायच्या नकीन प्रणालीमध्ये, सर्व मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडले जातील, जेणेकरून जेव्हा एखादी व्यक्ती कोणाला कॉल करेल तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे केकळ कॉलरचा मोबाइल नंबर नाही तर कॉल करणाऱया व्यक्तीचे नाक देखील असेल. आधार कार्डमध्ये जे नाव लिहिलेले असेल तेच नाक मोबाईलवर दिसेल. सिमकार्ड खरेदी करताना दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे कॉल करणाऱ्या लोकांचा फोटो ऍटॅच करेल. अशा प्रकारे, बनाकट लोक ओळखले जाऊ शकतात. म्हणजे सिम खरेदी करताना जो फोटो टाकला होता, तोच कॉलिंगच्या केळी दिसेल.

ट्राय कॉलर आयडी सिस्टीममध्ये कोणीही कॉल केल्यावर त्याचा नंबर आणि नाव दोन्ही स्क्रीनवर दिसतील. अशा परिस्थितीत कॉल रिसिव्ह करण्यापूर्वीच लोकांना कळेल की त्यांना कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव काय आहे. हा नियम लागू झाल्यानंतर कॉल करणारी व्यक्ती आपली ओळख लपवू शकणार नाही.





  Print






News - Rajy




Related Photos