विसापुरात बैलपोळ्याचा जल्लोष : बैलजोड्यांनी वेधले लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा बैलपोळा सण तालुक्यातील विसापूर येथे पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल ७३ बैलजोड्यांनी सहभाग नोंदवत आपल्या आकर्षक सजावटीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना रंगीबेरंगी झूल, विविध अलंकार आणि पारंपरिक पद्धतीने सजविले होते. काही बैलजोड्यांवर जनजागृतीपर संदेश असलेले फलकही लावण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या स्पर्धेमुळे परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. सजविलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
उत्कृष्ट सजावट स्पर्धेत अनिकेत गिरडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अंगद कष्टी यांनी द्वितीय, केतन ताजने यांनी तृतीय, शिवाजी डाहुले यांनी चतुर्थ, साईनाथ थेरे यांनी पाचवा, तर रविशंकर थेरे यांनी सहावा क्रमांक मिळविला. याशिवाय अन्य दहा बैलजोड्यांना बक्षिसे आणि दोन जोड्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. विजेत्यांसाठी वॉशिंग मशीन, टीव्हीसह विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
स्पर्धेचे परीक्षण कृ.उ.बा. समिती चंद्रपूरचे संचालक अनिल मोरे, बल्लारपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आत्राम, अजयपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाब लाडे, निशांत मोरे (आमडी) आणि राजेश देवाळकर यांनी केले.
बैलपोळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनकेश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सचिव गणेश कोकडे, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रीना कांबळे, सुरज टोमटे, गजानन पाटणकर, हर्षदा टोंगे, वैशाली पुणेकर, सुनील रोंगे, सुरेखा इटनकर, शशिकला जीवने, विद्या देवाळकर, दिलदार जयकर, प्रदीप गेडाम, संदीप काकडे तसेच ज्येष्ठ लिपिक संतोष निपुंगे, लिपिक राहुल टोंगे, अशोक ठुणेकर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




Petrol Price




