आंतरीक रक्षण करीत असतांनाच अवयव दान करुन जवानानी सामाजिक दायीत्वाची भावना जपली : पोलिस महानिरिक्षक राज कुमार


-आंतरीक सुरक्षा पदक प्रदान व अवयव दान कार्ड वितरण समारंभ संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /   गडचिरोली :
आपल्या देशात शारिरीक, आर्थिक आणि मानसीक विकासात नक्षलवाद चळवळीमुळे  मोठी समस्या निर्माण झाली आहे.  केंद्रीय राखीव पोलिस दल तथा राज्य पोलिस आंतरीक सुरक्षेत  प्रतिकुल परिस्थितीत सुध्दा  सतर्क राहून रक्षण करीत आहेत. अशाही परिस्थीतीत  आपल्या जवानांनी  मृत्युनंतरही अवयव दान करुन सामाजिक दायीत्वाची भावना जपली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक राज कुमार यानी केले.
 औद्योगिक विकास परिसरातील सी.आर.पी.एफ. प्रशिक्षण केंद्रात आयोजित आंतरीक सुरक्षा पदक प्रदान आणि अवयव दान कार्ड वितरण प्रसंगी ते बोलत होते. 
यावेळी  पोलिस उपमहानिरीक्षक टी. शेखर, अंकुश शिंदे,  केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अधिकारी प्रभाकर त्रिपाठी, रविन्द्र भगत, एन.शिवा संकरे, राम मीणा, शेलेंद्र बालकवडे , दिपककुमार साहु, कुलदिप सिंह खुराना, टी. के. सोळंखी, महेश्वर पंडीत, कैलाश गंगवो आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.
 गडचिरोली जिल्ह्यात  केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पाच तुकडया  राज्य राखीव पोलस दल, राज्याचे पोलीस यांच्यासह कार्यरत आहेत.  अतिशय दुर्गम भागात जीवाचे रान करुन आपले संरक्षण करीत आहेत.  या सेवाकाळात उत्तम कर्तव्य पार पाडल्याबध्दल आंतरीक सुरक्षा पदक देऊन अधिकारी व जवानांचे मनोबल वाढविणे आपले कर्तव्य आहे.  जिवाची पर्वा न करता  कर्तव्य बजावत असतांनाही एक सामाजिक दायीत्वाची भावना ठेवून मृत्युनंतरही आपले अवयव दान करुन एक महान कार्य  करीत असल्याबध्दल राजकुमार यांनी समाधान व्यक्त केले. जवान स्वेच्छेने पुढे येउुन या राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.                                                      
 पुढे बालतांना पोलिस महानिरिक्षक राजकुमार  म्हणाले की,  नक्षल प्रभावीत क्षेत्रात काम करीत असतांना नक्षल्यांनी  भुसुरुंगाचा वापर करुन जीवित हानी करीत आहेत.  तेव्हा आपल्या जवानांना आधुनिक तांत्रिक ज्ञान देऊन , बारुदची माहिती अवगत करुन , सर्व सर्चिंग ऑपरेशनची माहितीचे ज्ञान प्रशिक्षणाव्दारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या मंजुरीसाठी तत्कालीन पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनीही सातत्याने पाठपुरावा केला या प्रशिक्षण उपक्रमास शासनानी मंजुरी प्रदान केली. आज पासून १४ ऑगस्ट पर्यंत १५ केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान आणि राज्याचे १५ जवानाना या सहा दिवसाच्या प्रशिक्षणात सर्व आधुनिक तांत्रिक बाबींची माहिती देण्यात येत आहे. हा उपक्रम पुढे वार्षभर चालु राहील.  आणि जास्तीत जास्त जवान या  आधुनिक तांत्रिक ज्ञानाची माहिती अवगत करु शकेल, असे ते म्हणाले.
 याप्रसंगी उत्मरित्या कर्तव्य पार पाडलेल्या अधिकारी व जवानांना  आंतरीक सुरक्षा पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.  तसेच स्वेच्छेने अवयव दान करण्याचे घोषीत केले आहेत त्यांना सर्व इतंभुत माहितीचे स्मार्ट कार्ड पोलिस महानिरिक्षक राज कुमार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
   या कार्यक्रमात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन उप कमांडंट पतन सुमन यांनी केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-09


Related Photos