महत्वाच्या बातम्या

 लाभार्थ्यांना प्राप्त विहिरीवर वीजजोडणीसाठी महावितरणद्वारा एक खिडकी प्रक्रिया सुरु


- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालय अंतर्गत -आदिवासी विभाग, समाजकल्याण विभाग व कृषि विभागांद्वारा चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या/आलेल्या - बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषीस्वावलंबन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त विहीरींना वीजजोडणी देण्यास  महावितरणद्वारा एक खिडकी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाच्या परिसरात असलेल्या केंद्रीय ग्राहक सुविधा केंद्रात लाभार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.      

१७ ऑक्टोबर २०२२ रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार, शेतकरी बांधवांच्या जिवनात अमुलाग्र बदल घडविण्यास बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतुन लाभार्थ्यांना प्राप्त विहिरींवर वीजजोडणी मिळण्यात काही अडचणी येऊ नये यासाठी महावितरण चंद्रपुर परिमंडळ अंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील लाभार्थ्यांसाठी चंद्रपुर परिमंडळ कार्यालय परिसरात असलेल्या केंद्रिय ग्राहक सुविधा केंद्रात एक खिडकी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना, वीजजोडणीसाठी अर्ज करणे, डिमांड भरणे, लाभार्थ्यांनी व्यक्तीगत अर्ज करणे, ऑनलाईन अर्ज करणे इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येत असून अतिरीक्त कार्यकारी अभियंता, केंद्रीय ग्राहक सुविधा केंद्र चंद्रपूर संपर्क क्र. 7875758099  नोडल अधिकारी म्हणून कार्य सांभाळत आहेत.

लाभार्थ्यांना विनाव्यत्यय वीज जोडणी मिळण्यासाठी  महावितरण मोलाची जबाबदारी पार पाडणार असून चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी लाभार्थ्यांना केंद्रीय ग्राहक सुविधा केंद्रात संपर्क  साधण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos