महत्वाच्या बातम्या

 एमएआयडीसी व्यवस्थापक दिपक बांधे यांचा राज्यस्तरीय गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या (MAIDC) वर्धा येथील खत कारखान्याचे व्यवस्थापक दिपक  बांधे यांच्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत मुंबई येथील मुख्यालयात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. राज्याचे कृषी मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या शुभहस्ते श्री. बांधे यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

दिपक बांधे यांनी या वर्षात महामंडळाच्या खत व कृषी निविष्ठा उत्पादनांसाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सर्जनशील संकल्पनांचा सुरेख संगम घडवून आणला. केवळ उत्पादनाची जाहिरात न करता शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या मनात महामंडळाबद्दल दृढ विश्वास निर्माण केला.

या नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रमामुळे महामंडळाच्या विक्रीच्या आलेखाने नवा उच्चांक गाठला आहे. व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली हे यश साकार झाले असून बांधे यांच्या या विशेष योगदानाबद्दल महामंडळ परिवाराकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.





  Print






Related Photos