उद्या ९ ऑगस्ट ला स्मृतिशेष श्रीकृष्ण उबाळे यांचे द्वितीय स्मृती दिवस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन व शालवान पत्रिके द्वारा स्मृतिशेष श्रीकुष्ण उबाळे यांचे द्वितीय स्मुर्ती दिवस गुरुवार ९ ऑगस्ट रोजी अर्पण हॉल हिंदी मोरभवन, नागपूर येथे दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत कार्यकर्त्यां द्वारा आदरांजली अर्पित कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमात रिपब्लिकन चळवळ व श्रीकृष्ण उबाळे यांचे योगदान या विषयावर विस्तृत चर्चासत्र घेण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्तीथी म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष आरीपा अॅड. चंद्रशेखर देवतळे, अध्यक्ष बिईएफ महाराष्ट्र राज्य राजकुमार मुन, कामगार उपयुक्त तथा अध्यक्ष बी.आर.पाणबुडे, किराणा बाजार व दुकाने मंडळ मुंबई, माजी अध्यक्ष बिईएफ. महाराष्ट्र राज्य  एच. एन. मोरे व इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आरीपाचे जिल्हा अध्यक्ष नागपूर कमलेश सांगोळेे यांनी केले आहे.  Print


News - Wardha | Posted : 2018-08-08


Related Photos