पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन...!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका 
प्रतिनिधी / वरोरा : येथील शासकीय रुग्णालय.जिथे नेहमी रुग्णांना रक्तसाठी पायपीठ करावी लागते.वणी,गडचिरोली,आंध्रा येथून रुग्ण सतत येत असतात.कुणाला रक्त भेटते,तर कुणाला रक्तसाठी जीवाचे रान करा लागते.रक्ताअभावी कित्येक जिव गेल्याचे हे रुग्णालय साक्ष्य आहे. रक्तसाठी वाटेल ते करण्याची तयारी करुण सुद्धा वनवन भटकावे लागते. 
 अशीच घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली. शबाना सय्यद नामक स्त्री गर्भवती असल्याने तिच्या शस्त्रक्रियेसाठी अ - रक्तगट ची आवश्यकता होती. हा दुर्मिळ रक्तगट असल्याने मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले.अशावेळी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनशी संपर्क झाला.तत्काळ सोशल मीडिया वर् पोस्ट झळकली. इतक्यात चंद्रपुरचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वरजी रेड्डी यांचा फोन संस्थेला आला. त्यांचा अ - रक्तगट असल्याने त्यांनी रक्तदान करण्याची तयारी दर्शवली. इथेच मानुसकिचा जिवंत झरा अनुभवायला मिळाला.यावेळी क्षणाचाही विलंब न करता रक्ताचे महत्त्व ओळखून अधीक्षक यांनी रात्री १२ वाजता शासकीय रुग्णालय गाठले व् मोठ्या उत्साहाने रक्तदान करुण आज २१ व्या शतकात मानवाच्या हृदयात माणुसकी आजही जीवंत असल्याचे  दाखवून दिले. 
पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्यासारखे अधिकारी जर रक्तदान कार्यात हिरहिरिणे सहभाग नोंदविला तर आज एकही असा रुग्ण आढळणार नाही ,ज्याला रक्ताअभावी प्राण गमवावे लागेल. तो दिवस म्हणजे रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनचा सुवर्ण अक्षरात नोंद व्हावी असा दिवस अनुभवाला मिळाला.  त्यांच्या उत्कृष्ट या कार्यासाठी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन तर्फे डॉ.महेश्वरजी रेड्डी यांचे आभार व्यक्त करण्यात आले . 

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-09-16


Related Photos