रायगड जिल्ह्यात शिवशाही बसला अपघात , ३१ प्रवासी जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / रायगड :
  चालकाचा वाहनावरून नियंत्रण सुटल्याने रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला असून या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. 
शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दापोलीवरुन पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसला अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस पलटल्याने ३१ प्रवासी जखमी झाले. लोणेरे गावातील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ हा अपघात घडला. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.  Print


News - Rajy | Posted : 2018-08-25


Related Photos