महत्वाच्या बातम्या

 आदिवासी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्षपदी : गीताताई सलामे यांची नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी गीताताई  सुरेश सलामे रा. नवरगाव तालुका सिंदेवाही जि. चंद्रपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्या आदिवासींच्या  शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक मूलभूत संविधानिक हक्क व अधिकारासाठी तसेच आदिवासींवरील अन्याय अत्याचारा विरुद्ध संघर्षमय  लढा निर्भयपणे निरंतर  लढत असतात.

त्यांच्यातील जिद्द चिकाटी आणि काँग्रेसच्या सद विवेक विचारांचा आदर्श व एकनिष्ठपणा  या गोष्टींमुळे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी गीताताई सलामे यांचेवर विश्वास ठेवून त्यांची महिला आदिवासी काँग्रेसच्या चंद्रपूर  जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

गीताताई सलामे यांची शिफारस आदिवासी काँग्रेसचे प्रदेश जनरल सेक्रेटरी आदिवासी सेवक केशव तिराणिक यांचेकडून करण्यात आली. गीताताई सलामे यांचे महिला आदिवासी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती बद्दल  त्यांचे सर्वत्र अभिनंदन व्यक्त केल्या जात आहे.





  Print






Related Photos