गोंडपिंपरी पोलिसांची दमदार कामगिरी : चोरीचा २.४० लाखांचा मुद्देमाल फिर्यादींच्या स्वाधीन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस स्टेशन गोंडपिंपरीच्या हद्दीत चोरीस गेलेले १४ मोबाईल फोन व एक दुचाकी वाहन असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी तपासादरम्यान हस्तगत करून संबंधित फिर्यादींच्या ताब्यात परत केला.गोंडपिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी चोरीस गेलेल्या मोबाईल फोन व दुचाकी वाहनाबाबत दाखल तक्रारींचा पोलिसांनी तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले. त्यामध्ये १४ मोबाईल फोन व एका दुचाकीचा समावेश आहे. हस्तगत करण्यात आलेला एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रविवार, २३ ऑगस्ट रोजी संबंधित फिर्यादींच्या ताब्यात परत करण्यात आला.
गोंडपिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी कार्यक्षम तपास करून चोरीचा मुद्देमाल शोधून काढल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. मुद्देमाल परत मिळाल्यानंतर संबंधित फिर्यादींनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे आभार मानले. ही कारवाई पोलीस स्टेशन गोंडपिंपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांनी केली.




Petrol Price




