महात्मा गांधींच्या साक्षीने राहुल गांधींबाबतच्या पोस्टचा निषेध : युवक काँग्रेसचे शांततापूर्ण आंदोलन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी लोकशाही मार्गाने निषेधाची भूमिका मांडत बल्लारपूर शहर युवक काँग्रेसने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टचा शांततापूर्ण निषेध नोंदविला. सेवानिवृत्त भारतीय वायुसेना अधिकारी फ्लाइट लेफ्टनंट अनूप वर्मा यांनी राहुल गांधी यांची २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याच्याशी तुलना केल्याच्या पोस्टविरोधात हे आंदोलन करण्यात आले.
२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांना अभिवादन करत कार्यकर्त्यांनी संबंधित पोस्टबाबत आपला निषेध व्यक्त केला. राहुल गांधी यांच्याबाबत करण्यात आलेली तुलना आक्षेपार्ह असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी किंवा आक्रमक पद्धतीचा अवलंब न करता शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन केले.
महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आंदोलनातून सोशल मीडियावरील वक्तव्यांविरोधात लोकशाही पद्धतीने आवाज उठविण्याचा संदेश देण्यात आला. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेससोबत ओबीसी सेल आणि अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव चेतन गेड़ाम, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष पवन भगत, ओबीसी विभागाचे शहर अध्यक्ष गणपत इटनकर, संजय झीलेवार, रुपेश रामटेके, आकाश येवले, नरेश गुंडापल्ली, आकाशकांत दुर्गे, अहमद ढाकवाला, गुरु कामटे, दिलीप, निर्मल, यश माकोडे, सोनू काम्पेल्ली, गौरव बोबडे, शुभम मेलकर, नितीन सोयाम, सनी मिलगलवार, असलम शेख, संकेत बालसरे, पंकज मस्के, नितीन तेलंग, श्रीकांत मारपक्का, सतीश दरपल्ली, राहुल प्रसाद, प्रकाश गोलकर, श्रीकांत, विष्णू आरेकर, संजीव सदाला आदी उपस्थित होते.




Petrol Price




