महत्वाच्या बातम्या

 उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्हा दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोमवार 3 ऑक्टोंबर रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

सकाळी 9.45 वाजता भंडारा येथील लक्ष्मी सभागृहातील कार्य अहवाल प्रकाशन व कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती. 

त्यांनतर सकाळी 10.40 वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती.

दुपारी 1.10 वाजता जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा येथे जिल्हास्तरीय सर्वरोग वैद्यकीय व दंत आरोग्य शिबीराला भेट देतील. त्यानंतर दुपारी 1.20 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

  Print


News - Bhandara
Related Photos