महत्वाच्या बातम्या

 प्रकल्पग्रस्त नेरला गावाचे कुटुंबसंख्या निश्चित आक्षेप नोंदविण्यास ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : प्रकल्पांतर्गत मौजा नेरला, तालुका पवनी येथील प्रकल्पग्रस्तांना सध्याच्या गावठाणातून स्थलांतरित करण्यात येणार नसून, निश्चित करण्यात आलेल्या कुटुंबांना एकरकमी आर्थिक पॅकेज देण्यात येणार आहे. यासाठी पात्र कुटुंबांची संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली असून, जाहीर करण्यात आलेल्या कुटुंबसंख्येबाबत काही आक्षेप किंवा तक्रारी असल्यास ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, साई किरण नंदाला यांनी केले आहे.

महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम, १९९९ अन्वये ग्रामपंचायत कार्यालय, नेरला येथील २० डिसेंबर २०२४ रोजीच्या ठरावाची तारीख कुटुंबसंख्या निश्चितीसाठी मानिव दिनांक म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित कुटुंबांची पडताळणी करण्यासाठी शासकीय अभिलेखांचा आधार घेण्यात आला. यामध्ये राशन कार्ड, सातबारा व फेरफार नोंदी, वीजबिल, गाव नमुना क्रमांक ८, पाणी जोडणी आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

तसेच, स्थानिक प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत नव्याने पुनर्सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे अनुसूची-१ तयार करून जाहीर सूचना स्थानिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आक्षेप व तक्रारी ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करा -
जाहीर सूचनेमध्ये निश्चित करण्यात आलेल्या कुटुंबसंख्येबाबत कोणाला आक्षेप किंवा तक्रार असल्यास त्यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजीपर्यंत किंवा त्यापूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालय, भंडारा येथे लेखी स्वरूपात सादर करावी. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा अथवा तक्रारींचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





  Print






Related Photos