महत्वाच्या बातम्या

 शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील विद्यमान सदस्य नागो गाणार यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणूकीसाठी तयारी सुरु करण्यात आली असून १ ऑक्टोंबर पासुन मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु झालेला आहे. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याने पात्र मतदारांनी नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
मागील निवडणूकीत सन २०१७ मध्ये वर्धा जिल्ह्यांतर्गत ४ हजार २७९ मतदार नोंदणी झाली होती. मतदार नोंदणीचा पहिला टप्पा ७ नोव्हेंबर रोजी संपत असून २ हजार ५४१ पात्र शिक्षकांची मतदार नोंदणी झालेली आहे. मागील निवडणूकीपेक्षा अधिक मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असून अद्यापही ज्या पात्र शिक्षकांनी मतदार नोंदणी केलेली नाही, अशा पात्र शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे. यासाठी सर्व राजकीय पक्ष व शिक्षक संघटना यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन मतदार वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos